डॉ.योगेश क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बीड विधानसभा अध्यक्षपदाचा दिला राजीनामा

Beed

डॉ.योगेश क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बीड विधानसभा अध्यक्षपदाचा दिला राजीनामा

बीड (प्रतिनिधी)

दि.१५ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बीड विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा डॉ.योगेश भारतभूषण क्षीरसागर यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे शनिवारी (दि.१५) सुपूर्द केला आहे. स्थानिक स्तरावर पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत जाणीवपूर्वक डावलले जात असल्याचा आरोप त्यांनी पत्रातून केला आहे.

डॉ.योगेश क्षीरसागर म्हणाले की, “मी बीड विधानसभा अध्यक्षपदावर निष्ठेने काम करत होतो. मात्र वेळोवेळी मला पक्षाच्या स्थानिक निर्णयांमध्ये सामावून घेतले जात नव्हते. ही बाब अनेकदा वरिष्ठांच्या निदर्शनास आणूनही दिली; पण कोणतीही दखल घेतली गेली नाही.” पक्षाने दिलेल्या जबाबदारीतून पक्षाची विचारधारा तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत प्रामाणिकपणे पोहोचवली. “माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल सर्व वरिष्ठ नेत्यांचे मनःपूर्वक आभार,” असेही त्यांनी नमूद केले आहे. डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या राजीनाम्यामुळे आगामी स्थानिक राजकारणात कोणते बदल होतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

पुढील भूमिका लवकरच जाहीर करणार!

डॉ.योगेश क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बीड विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर स्थानिक राजकारणात उत्सुकता वाढली आहे. आपल्या पुढील राजकीय भूमिकेबाबत लवकरच घोषणा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत.

Sharing

Visitor Counter