पावसामुळे गाडी घसरून भीषण अपघात; आर. टी. देशमुख यांचा मृत्यू, अंगरक्षक व चालक गंभीर जखमी
Beed

पावसामुळे गाडी घसरून भीषण अपघात; आर. टी. देशमुख यांचा मृत्यू, अंगरक्षक व चालक गंभीर जखमी
बीड प्रतिनिधी
पावसामुळे रस्त्याच्या कडेला साचलेल्या पाण्यामुळे गाडी घसरून मोठा अपघात झाल्याची दुर्घटना घडली. या भीषण अपघातात आर. टी. देशमुख यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघाताच्या वेळी गाडीत आर. टी. देशमुख यांच्यासोबत त्यांचे अंगरक्षक आणि चालक प्रवास करत होते.
गाडी स्लिप होऊन नियंत्रण सुटल्याने ती रस्त्याच्या कडेला जोरात आदळली. या अपघातात आर. टी. देशमुख गंभीर जखमी झाले होते मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तसेच, गाडीतील अंगरक्षक व चालक देखील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.अपघातानंतर स्थानिकांनी व पोलिसांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
