ज्येष्ठ नागरिक पद्मादेवी कुकडेजा यांचे निधन

ज्येष्ठ नागरिक पद्मादेवी कुकडेजा यांचे निधन
बीड प्रतिनिधी
बीड शहरातील प्रतिष्ठित कुकडेजा कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक पद्मादेवी परसराम कुकडेजा यांचे गुरुवारी, दिनांक १५ मे २०२५ रोजी निधन झाले. त्या हरेशकुमार यांची आई व आनंदकुमार (छोटू) यांची आजी होत्या.श्रीमती पद्मादेवी कुकडेजा यांचे जीवन धार्मिक वृत्तीचे असून, समाजात त्यांचा सन्माननीय असा मान होता. त्यांच्या निधनाने कुटुंबासह समाजातही हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार शुक्रवार, दिनांक १६ मे रोजी सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहेत. अंतिम यात्रा साक्षी बिल्डिंग, सारडा नगरी, सहयोग नगर येथील राहत्या निवासस्थानावरून अमरधाम, मोढा रोड, बीड येथे नेण्यात येईल.भगवान त्यांच्या आत्म्यास शांती देवो, अशी श्रद्धांजली अनेक भाविकांनी अर्पण केली असून, दै. बीड प्रसार परिवार कुकडेजा परिवाराच्या दुःखात सहभागी आहे.
