अट्टल महाविद्यालयात १५ जूनला मराठी विषयाचे राष्ट्रीय वेबिनार

Georai

अट्टल महाविद्यालयात १५ जूनला मराठी विषयाचे राष्ट्रीय वेबिनार

गेवराई/प्रतिनिधी

जगात सध्या कोरोना या महामारीने अत्यंत उग्र रूप घेतले असून, दिवसेंदिवस हा विळखा माणसाभोवती अधिक घट्ट होत आहे. जगात आज लाखो माणसे मृत्युमुखी पडली असून जनजीवन ठप्प झाले आहे. त्याचीच मोठी झळ आपल्या देशालाही बसून त्यातून कसा मार्ग काढावा हाच सर्वांपुढे मोठा प्रश्न पडला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आपली मराठी भाषा आणि साहित्याची स्थिती काय असेल यावर विचार मंथन करण्यासाठी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित र. भ. अट्टल कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, गेवराई, जिल्हा बीड येथे दि. १५ जून २०२० रोजी सकाळी ११ वाजता राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. रजनी शिखरे या करणार असून अध्यक्षस्थानी सुंदरराव सोळुंके महाविद्यालय, माजलगाव येथील मराठी विभाग प्रमुख डॉ. भाऊसाहेब राठोड असणार आहेत. या वेबिनारमध्ये "कोरोनानंतरची मराठी भाषा आणि साहित्याची स्थिती" या विषयावर चर्चा होणार असून त्यासाठी विषयतज्ज्ञ म्हणून विश्वभारती विद्यापीठ, पश्चिम बंगालचे विभाग प्रमुख प्रा. सुमेध रणवीर आणि आधुनिक भारतीय भाषा, अलिगड मुस्लीम केंद्रीय विद्यापीठ, उत्तर प्रदेश येथील प्रभारी मराठी विभाग प्रमुख डॉ. ताहेर पठाण हे आपले विचार मांडणार आहेत. हा ऑनलाइन वेबिनार अभ्यासकांसाठी विनाशुल्क असून मराठी माध्यमातून असणार आहे. यात सहभाग घेतलेल्या अभ्यासकांना प्रमाणपत्र त्यांच्या नोंदणीकृत ई मेलवर पाठविण्यात येणार असून त्यासाठी नाव नोंदणी करणे आवश्यक असेल. नोंदणीसाठी र. भ.अट्टल महाविद्यालयाच्या फेसबुक पेजवर लिंक दिलेली असून, व्हाट्सअप ग्रुप मध्ये सुद्धा सहभागी व्हावे जेणेकरून ई-प्रमाणपत्र व योग्य त्या सूचना मिळतील. या वेबिनारमध्ये सहभागी होण्यासाठी दिलेल्या फेसबुक पेजवर लाईक करून १५ जून रोजी सकाळी ११ वाजता ऑनलाईन यावे असे आवाहन प्राचार्य डॉ. रजनी शिखरे, वेबिनारचे आयोजक तथा मराठी विभाग प्रमुख डॉ. संदीप बनसोडे, डॉ समाधान इंगळे, प्रा. शरद सदाफुले यांनी केले आहे. वेबिनारच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे आयक्यूएसी समन्वयक डॉ. प्रशांत पांगरीकर, संगणकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सुहास मचे, प्रा. करुणा पटेल, सुदर्शन निकम, प्रा.राजेंद्र बरकसे आदींसह प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

Sharing

Visitor Counter