बदामराव पंडित यांच्या हस्ते रोग प्रतिकारक्षमता वाढविणाऱ्या आर्सेनिक अल्बम-30 गोळ्यांचे मोफत वाटप

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माजी सभापती पंढरीनाथ लगड यांच्यावतीने, शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या हस्ते रोग प्रतिकारक्षमता वाढविणाऱ्या आर्सेनिक अल्बम-30 गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात
बीड/प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माजी सभापती पंढरीनाथ लगड यांच्यावतीने, शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या हस्ते मादळमोहीतील घराघरात प्रत्येक व्यक्तीला रोग प्रतिकारक्षमता वाढविणाऱ्या आर्सेनिक अल्बम-30 गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले आहे.कोरोना या महामारीमुळे सर्वत्र लॉक डाऊन झाले असताना, शिवसेनेचे माजी सभापती पंढरीनाथ लगड यांनी 50 हजार रुपयांचा एफ.डी. मोडून गोरगरिबांना व गरजूंना जीवनावश्यक किराणा सामान वाटप केले होते. त्यानंतर दिनांक 12 जून रोजी शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या हस्ते मादळमोही व बुधनरवाडी येथील प्रत्येक घरातील, प्रत्येक व्यक्तीला रोगप्रतिकारक्षमता वाढविणाऱ्या आर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांचे पंढरीनाथ लगड यांच्यावतीने वाटप करण्यात आले. याप्रसंगी डॉ अरुण भस्मे आवर्जून उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना, माजी राज्यमंत्री बदामराव पंडित म्हणाले की, कोरोनाला घाबरू नका. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी, तोंडाला मास्क बांधणे, वेळोवेळी साबणाने हात स्वच्छ धुणे आणि सोशल डिस्टनसिंगचे पालन करणे, यासह आरोग्य विभाग आणि सरकारने वेळोवेळी सांगितलेले, सर्व नियम काटेकोरपणे पाळावेत असे सांगितले. यावेळी डॉ अरुण भस्मे म्हणाले की, अर्सनिक अल्बम 30 या गोळ्या कोरोनासह कित्येक आजारांपासून बचाव करण्यासाठी रोग प्रतिकार क्षमता वाढवितात. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने काळजीपूर्वक या गोळ्यांचे सेवन करावे. तसेच अर्सनिक अल्बम 30 ही औषधे तीन दिवस सकाळी उपाशीपोटी घेतल्यानंतर कच्चा कांदा व लसूण त्या तीन दिवस खाऊ नये. त्यासोबतच कापूरचा वास घेऊ नये. असे सांगुन डॉ अरुण भस्मे म्हणाले की, सध्या या परिस्थितीचा गैरफायदा घेत काही लोक आर्सेनिक अल्बमच्या नावाखाली बनावट व निष्काळजीपणे औषधी विक्री करत आहेत. त्यापासून नागरिकांनी सावध राहावे व डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधी घ्यावी असे आवाहन केले. याप्रसंगी माजी सभापती पंढरीनाथ लगड, जि प सदस्य बप्पासाहेब तळेकर, विश्वंभरराव वारंगे, निलेश भोपळे, कॉम्रेड पुरी, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका आदींची उपस्थिती होती.








