तलवाडा येथील श्री साईराम अर्बन मल्टिस्टेट बँकेकडून मयताचे वारस पत्नीला तीन लाखाची मदत

तलवाडा येथील श्री साईराम अर्बन मल्टिस्टेट बँकेकडून मयताचे वारस पत्नीला तीन लाखाची मदत
तलवाडा/प्रतिनिधी
गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील शरद रखमाजी शिंगणे या युवकाचा विजेचा शाॅक लागून अपघाती मृत्यू झाला होता. त्याने श्री साईराम अर्बन मल्टिस्टेट को-आॅप.सो.लि.बीड या बँकेच्या तलवाडा शाखेतून कर्ज घेतले होते. या बँकेचे अध्यक्ष साईनाथ प्रभुणे यांनी मयताचे वारस पत्नीला विम्यापोटी तीन लाखाची मदत मिळवून दिली आहे. सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करत त्यांनी आपल्या मयत कर्जदार खातेदाराच्या वारस पत्नीला तीन लाख रुपयांची आर्थिक मदत दिल्याबद्दल त्यांचे अनेकांनी कौतुक केले आहे. तीन लाख रुपये मदतीच्या धनादेशाचे वितरण शनिवार दि.१३ जून २०२० रोजी बँकेचे अध्यक्ष साईनाथ प्रभुणे, सपोनि सुरेश उणवने, माजी जि.प. सदस्य अॅड.सुरेश हात्ते, सरपंच राधाकिसन शिंगणे महाराज, पं.स.सदस्य प्रा.शाम कुंड, पत्रकार बापू गाडेकर, अल्ताफ कुरेशी, आर.आर.आबा बहीर, दादाराव रोकडे, बळीराम शिनगारे, दिलीपशेठ तोष्णीवाल आदींच्या उपस्थितीत करण्यात आले. जर या बँकेच्या खातेदाराचा अपघाती मृत्यू झाला तर त्याच्या वारसाला देखील रोख अकरा हजार रूपये बँकेकडून मदत म्हणून देण्याचे काम श्री साईनाथ प्रभुणे हे स्वतः सातत्याने करत आहेत. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून आपल्या बँकेच्या खातेदारांना संकटकाळात आधार दिला पाहिजे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून ते बँकेच्या माध्यमातून काम करत असल्याने त्यांचे अनेकांनी कौतुक केले आहे.








