जल जीवन योजनेच्या हेरिंग साठी आलेल्या इंजिनीयर आणि तक्रारदारात भर रस्त्यावर गोंधळ

जल जीवन योजनेच्या हेरिंग साठी आलेल्या इंजिनीयर आणि तक्रारदारात भर रस्त्यावर गोंधळ
बीड प्रतिनिधी
बीड जिल्ह्याचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न चव्हाट्यावर आल्याचा प्रकार समोर येत आहे आज चक्क जलजीवन योजनेअंतर्गत झालेल्या भ्रष्टाचाराविषयी सीओ अजित पवार यांच्यासमोर तारखेला उपस्थित राहणाऱ्या इंजिनीयर आणि तक्रारदार यांचे भर रस्त्यावर शिवीगाळ करत धराधरी झाली. हा सर्व प्रकार जिल्हा परिषद समोर रोडवर झाला तक्रारदार आणि इंजिनियर मध्ये झालेल्या वादाने मोठी गर्दी पाहण्यास मिळाली. या गोंधळात तक्रारदाराने इंजिनियर दारू पिऊन हजर राहिल्याचा आरोप केला आहे. नेमकं जल जीवनचा प्रकरण मिटणार कधी? असा प्रश्न सर्वसामान्य कडून उपस्थित केला जात आहे. जल जीवन योजने अंतर्गत झालेल्या भ्रष्टाचार विषयी आज तारखेला नेमकं काय घडलं याची माहिती घेण्यासाठी सी .ओ अजित पवार यांना दूरध्वनीवरून संपर्क केले असता त्यांनी फोन उचलला नाही यामुळे आज झालेल्या हेरिंग विषयी माहिती मिळू शकली नाही.
