विना नंबरच्या हायवा टिप्परने भरधाव वेगात दोन दुचाकीस्वरास वडीग्रोद्री कॅनलवर उडवले

Beed

विना नंबरच्या हायवा टिप्परने भरधाव वेगात दोन दुचाकीस्वरास वडीग्रोद्री कॅनलवर उडवले

एक जखमी दोन कॅनलच्या पाण्यात बुडाले 

जायकवाडीच्या डाव्या कॅनलमध्ये बुडालेले दोन तरुणांचा गोंदी पोलीस घेत आहेत शोध 

शहागड/ प्रतिनिधी

अबंड तालुक्यातील वडीग्रोद्रीच्या डाव्या कॅनलवर सोमवारी पाच वाजण्याच्या सुमारास धाकलगाव करून मुरूम भरलेला विना नंबर हायवा टिप्पर भरधाव वेगात शहागड कडे येत असताना हायवा टिप्पर चालकाने भरधाव वेगात शहागड कडे येत असलेली हिरो होंडा मोटरसायकल ला प्रथम उडवले, हिरो होंडा मोटरसायकल स्वार जाग्यावरच पडलेला होता व पुढे थोड्याच अंतरावर जाऊन टिप्पर चालकने शाईन मोटरसायकलस्वार दोघाला उडवले या दुहेरी अपघातात दोघे जण जायकवाडीच्या डाव्या कालव्यात बुडालेले असून ते अद्यापही बेपत्ता असून गोंदी पोलीस त्यांचा शोध घेत आहे तर लहु बाबुराव गायकवाड हे जखमी आहेत.

 

दोन्ही मोटरसायकल मागे-पुढे शहागड कडे येत असताना भरधाव हायवा टिप्परने पाठीमागून या दोन्ही दुचाकी जोरात जोराची टक्कर दिली यात

शाईन दुचाकी स्वार एम.एच‌.21 बी.के‌ 5626 वरील दोन्ही तरुणांना जबरदस्त धडक बसल्याने शाईन पुलावरच पडली आणि तरुण पुलावरण जायकवाडीच्या डाव्या कालव्यातील पाण्यात पडले, पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने व गंभीर मार लागल्याने दोन्ही तरुण जायकवाडीच्या नाथसागर धरणातून सिंचनासाठी सोडण्यात आलेल्या पाण्यात पडलेले आसून प्रवाह जास्त असल्याने दोन्ही तरुण वाहून गेल्याची शक्यता असून, घटनास्थळी गोंदी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुभाष सानप, पोलीस उपनिरीक्षक गणेश राऊत, जमादार गणेश मुंडे,पो.का.अविनाश पगारे यांनी युद्ध पातळीवर मदत करत शोध मोहीम हाती घेतलेले असून सुमारे पाच किलोमीटर कॅनॉलच्या पाण्यात या दोन्ही तरुणाचा पाच वाजल्यापासून शोध आठ वाजेपर्यंत चालू होता. अंधार पडल्यामुळे शोध मोहीम संत गतीने चालू होती. 

भंगार व्यवसायिक जखमी लहु बाबुराव गायकवाड वय 47 वर्ष रा.शहागड यांचा हात फ्रॅक्चर झालेला असून, कॅनल मध्ये पडताना ते वाचले, त्यांच्या गाडीला भंगारचे साहित्य बांधले असल्याने ते बाल- बाल बचावले, शाईन दुचाकी चालक महेश आप्पासाहेब गायकवाड वय 21 वर्षे, युवराज संतोष गायकवाड 19 वर्ष,दोघे चुलत भाऊ रा. भोगलगाव ता.घनसावंगी असल्याची माहिती मिळत होती.विना नबंरचा टिप्पर चालक जाग्यावर गाडी सोडून फरार झालेला होता. टिप्पर धाकलगाव येथील असल्याची माहिती मिळत होती. टिप्पर चालकाने भंगार व्यवसायिक लहू गायकवाड याला प्रथम उडवले पंरतु लहु गायकवाड यांच्या मोटरसायकल हिरो होंडाला बाजूने भंगाराचे साहित्य बांधलेले असल्याने ते पुलाच्या कठोडयाला लागून रोडवर पडले, पुढे याच पुलावर भरधाव टिप्पर चालकाने पाठीमागणं शाईन मोटरसायकलला धडक दिली या कॅनॉलच्या पुलाला पुढे कठोडे नसल्याने शाईन स्वार दोघे हि कॅनॉलच्या पाण्यात बुडाले, या कॅनलच्या पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने ते वाहून गेल्याची शक्यता आहे. शाईन गाडी मात्र पुलावरच पडलेली होती. अपघात ग्रस्त दोन्ही दुचाकी व टिप्पर हायवा पोलीस चौकी येथे जमा करण्यात आलेला असून, जखमी लव बाबुराव गायकवाड यांना प्रथम माऊली हॉस्पिटल अंकुश नगर येथे हलवण्यात आलेले होते. या ठिकाणी परिसरातील शेतकरी व आमदार त्यांची बघायची गर्दी केलेली होती.

Sharing

Visitor Counter