दोन हजाराच्या नोटा बंद; २००० रुपयांच्या नोटा बाजारातून मागे घेण्याचा निर्णय !

दोन हजाराच्या नोटा बंद; २००० रुपयांच्या नोटा बाजारातून मागे घेण्याचा निर्णय !
बीड प्रतिनिधी
दोन हजाराच्या नोटा चलनातून बंद होणार असल्याची माहिती आरबीआयने दिली यामुळे मोठी खळबळ उडाली असून 30 सप्टेंबर पर्यंत दोन हजाराच्या नोटा बँकेत जमा करता येतील अशी ही माहिती आरबीआयकडून देण्यात आली असून आरबीआयने २००० रुपयांच्या नोटा बाजारातून मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आरबीआयने इतर बँकांना २ हजार रुपयांच्या नोटा जारी करणे थांबवा, असा सल्लाही दिला आहे. इथून पुढे २ हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद होणार आहे. या नोटा ३० सप्टेंबरपर्यंत बँकेत जमा करता येतील, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे. ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत नागरिकांना या नोटा बँकेतून बदलून घेता येतील.ग्राहकांना २ हजार रुपयांच्या नोटा देणं तातडीने थांबवा, असे आदेश रिझर्व्ह बँकेने देशभरातील बँकांना दिले आहेत. 'क्लिन नोट पॉलिसी'च्या अंतर्गत रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला आहे. भारतीय रिझर्व बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटेची छपाई बंद करणार असल्याची घोषणा केलीये. मात्र, असे असले तरी २००० रुपयांची लगेचच बंद होणार नाही किंवा चलनातून बाद होणार नाही. मात्र इतर बँकांना २००० हजारांची नोट ग्राहकांना देऊ नका, अशी सूचना करण्यात आलेली आहे. या नोटा पुन्हा बँकेत जमा करण्यासाठी २३ मे ते ३० सप्टेंबरपर्यंतचा कालावधी असणार आहे.२३ मे २०२३ पासून तुम्ही बँकांमध्ये जाऊन २ हजारांच्या नोटा बदलून घेऊ शकता. परंतु एका वेळी केवळ २० हजार रुपयांच्या नोटाच अर्थात १० नोटाच तुम्हाला बदलता येतील.








