महिलेवर हात उचलणे हि कसली मर्दानगी!

महिलेवर हात उचलणे हि कसली मर्दानगी!
संपर्कप्रमुख धोंडू तात्या पाटील व जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांची पक्षातून हकालपट्टी
बीड प्रतिनिधी
महाराष्ट्राची रणरागिनी बीड जिल्ह्याची सुपुत्री शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांच्यावर पक्षांतर्गत वादामुळे हात उचलल्याचा व्हिडिओ शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी व्हायरल केला, यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, सुषमाताई अंधारे यांना आपण दोन चापट मारल्या, या व्हिडिओने महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली, महाराष्ट्रात भल्या भल्यांना सळो की पळो करून सोडणाऱ्या शिवसेनेच्या नेत्या अंधारे यांच्यावर विविध आरोप करत हात उचलण्याचा दवा करणाऱ्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव व संपर्कप्रमुख धोंडू तात्या पाटील यांची आज शिवसेनेमधून अक्कलपट्टी केली असल्याची माहिती मिळाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य मध्ये एका महिलेला मारहाण केल्याची कबुली देणाऱ्या आप्पासाहेब जाधव यांची हीच का मर्दानगी?
उद्या दिनांक 20 मे रोजी शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात शिवसेनेची महाप्रबोधन सभा होणार आहे खासदार संजय राऊत व शिवसेनेचे उपनेते सुषमाताई अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली या सभेचे आयोजन करण्यात आले आहे, सभा ऐतिहासिक ठरावी यासाठी सामान्य कार्यकर्ते पासून तर पदाधिकाऱ्यापर्यंत सर्वांचेच प्रयत्न सुरू आहेत, सभेचे नियोजन पाहण्यासाठी काल सायंकाळी सुषमाताई अंधारे व पदाधिकारी यांनी सभा स्थळाची पाहणी केली, याच दरम्यान शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव व जिल्हा उपप्रमुख गणेश वरेकर यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली, या चकमकीचे रूपांतर हमरा तूरी वर आले, प्रकरण वाढू नये म्हणून सोबत असलेले जिल्हाप्रमुख अनिल जगताप माजी आमदार सुनील धांडे यांनी मध्यस्थी करून प्रकरण जागेवरच मिटवले, मात्र या सर्व प्रकरणाचा राजकारणासाठी वापर करत आप्पासाहेब जाधव यांनी सोशल माध्यमाच्या द्वारे आपण शिवसेनेच्या उपनेते सुषमाताई अंधारे यांना दोन चापट मारल्या असल्याचे कबुली जबाब दिला, प्रथम दर्शी अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे सांगण्यात येत असून, घटनास्थळावर हजर असलेल्या शिवसैनिकांनी यामध्ये स्पष्टपणे सांगितले असून आप्पासाहेब जाधव यांच्या भाची शैलीमुळे एका कार्यकर्त्या सोबत त्यांचा वाद झाला या वादामध्ये उप जिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांनी उडी घेतली, मात्र या सर्वात महाराष्ट्राची रणरागिणी सुषमाताई अंधारे यांचा कसलाही सहभाग नसताना त्यांच्यावर विविध आरोप करत त्यांना बदनाम करण्याचा कट अप्पासाहेब जाधव यांनी रचला, बीड जिल्ह्याच्या भूमिपुत्र असलेल्या सुषमाताई अंधारे यांच्यावर आरोप करणे व त्यांना मारहाण करण्याचा कबुली जवाब देणे आप्पासाहेब जाधव यांच्या चांगलेच अंगलट येणार आहे . छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यामध्ये एका महिलेला मारले असल्याचा कबुली जवाब देणाऱ्या आप्पासाहेब जाधव यांच्यावर काय कारवाई होणार! शिवसेनेच्या वतीने संपर्कप्रमुख धोंडू तात्या पाटील व जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांची हकालपट्टी केली असल्याचे पत्र प्रसार माध्यमांना देण्यात आले असून तात्काळ त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याने सामान्य शिवसैनिकात समाधान व्यक्त केले जात आहे. महा प्रबोधन सभा यशस्वी यशस्वी होऊ नये यासाठी विरोधकांचे कटकारस्थान सुरू असल्याचा आरोप सुषमाताई अंधारे यांनी केला असून बीडची सभा ही ऐतिहासिक होणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.








