राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या वाढीसाठी बाजीराव महाराज राठोड यांनी आवळली वज्रमुठ

राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या वाढीसाठी बाजीराव महाराज राठोड यांनी आवळली वज्रमुठ
भक्ती अन शक्तीची सांगड असलेल्या बाजीराज महाराजांची मराठवाडा संघटकपदी निवडीनंतर युवक लागले कामाला
बीड/प्रतिनिधी
एकसंघ संघटना अन समाज एकत्रीत बांधणीसाठी बीड जिल्ह्याचे भक्ती अन शक्तीमधील आदर्श व्यक्तीमहत्व युवकांच्या फळीत राहून समाजाचे नेतृत्व करणारे महंत बाजीराव महाराज राठोड यांची राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या मराठवाडा संघटक पदी निवड झाल्यानंतर जिल्ह्यातील युवकांची राष्ट्रीय बंजारा परिषदेत इनकमिंग वाढली असून बाजीराव महाराज राठोड यांनी संघटना वाढीसाठी वज्रमुठ आवळली असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या अनेक वर्षापासून संघटना समन्वयक किसनभाऊ राठोड यांच्या सोबत राहून राष्ट्रीय बंजारा परिषदेचे बीड जिल्ह्यात पाय रोवण्याचे काम बाजीराव महाराज राठोड यांनी केले आहे. त्यांच्या मतभाषी बोलण्याबरोबर राजकीय खेळीमुळे जिल्ह्यातील तरूणांची फळी त्याच्या सोबत असते. यामुळे समाजाच्या विविध घटकात कायम अग्रेसर राहून समाज संघटीत करण्यासाठी बाजीराव महाराज राठोड काम करता आहे. आज मागील काही दिवसापुर्वी महाराजांची जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीानंतर जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी बैठका घेवून नुतन कार्यकारणी करत संघटनेच्या वाढीला गती आणली होती. त्यांच्या झालेल्या मराठवाडा संघटक पदाच्या निवडीनंतर संघटनेमधील अनेक तरूणांना पुन्हा एकदा एकीचे बळ आले असून जिल्ह्यात संघटना वाढीसाठी जोमाने कामाला लागले आहेत. संघटनेची नवी दिशा आणि संघटनेला पुढे नेण्यासाठी बाजीराव महाराज नेहमीच अग्रेसर राहत असल्याचे दिसून येत आहेत. पुढील काळात समाजातील नव युवकांची एक वेगळी फळी तयार करत संघटन आणि संघटना मोठ्या जोमाने वाढीसाठी वज्रमुठ आवळली असल्याचे सांगितले आहे.








