अहमदपुर-अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग निकृष्ट रस्त्याप्रकरणात जिल्हाधिकारी यांचे प्रकल्प संचालकांना पत्र

अहमदपुर-अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग निकृष्ट रस्त्याप्रकरणात जिल्हाधिकारी यांचे प्रकल्प संचालकांना पत्र
बीड/वार्ताहर
बीड जिल्ह्य़ातील राष्ट्रीय महामार्ग अहमदपूर-अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डी बीड तालुक्यातील नेकनुर ते मांजरसुंभा दरम्यान निकृष्ट कामामुळे रस्त्यावर भेगा व खड्डे पडल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असुन रखडलेले रस्ताकाम लवकरात लवकर पुर्ण करण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे यांनी जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत केंद्रीय मंत्री नितिनजी गडकरी व प्रकल्प संचालक अरविंद काळे यांना केली होती त्या अनुषंगानेच अपर उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी संबधित प्रकरणात प्रकल्प संचालक भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण औरंगाबाद यांना पाठवत तक्रारीची दखल घेऊन नमुद मुद्यांबाबत नियमानुसार आवश्यक कार्यवाहीबाबत कळवले आहे.
अहमदपूर-अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डी चे काम ४-५ वर्षापासून रखडलेले असुन निकृष्ट कामामुळे रस्त्यावर भेगा व खड्डे पडले असुन अपघाताचे प्रमाण जास्त वाढले असुन नेकनुर ते मांजरसुंभा दरम्यान गवारी फाट्यावरील रस्त्यावर पडलेल्या भेगा तसेच अपघातामुळे बळी जाणारांची संख्या वाढल्याचे तक्रारीत नमूद करून लवकरात लवकर काम पुर्ण करण्याबाबत मागणी केली होती.








