परळीत व्यापारी महासंघातर्फे स्नेह मिलन कार्यक्रम संपन्न

Beed

परळीत व्यापारी महासंघातर्फे स्नेह मिलन कार्यक्रम संपन्न

परळी । प्रतिनिधी

परळी येथे व्यापारी महासंघातर्फे आर्य समाज येथे स्नेह मिलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर अध्यक्षस्थानी आडत व्यापारी अध्यक्ष माऊली फड तसेच व्यासपीठावर प्रमुख पाहुणे जुगल किशोर लोहिया बोलताना म्हणाले की व्यापार्‍यांनी उद्योगात काम करताना नवीन येणार्‍या टेक्नॉलॉजी प्रमाणे उद्योग करावा. यावेळी कायद्याची माहिती व्यापार्‍यांनी घ्यावी या माहितीवर एक दुसर्‍या व्यापार्‍याची चर्चा करावी जर या चर्चेतून शासनाचा बोजा जीएसटी कमी करण्यासाठी आपण सर्व व्यापारी एकत्र येऊन शासनाला जॉब विचारू ज्यामुळे जीएसटी कमी कशी होईल बीड जिल्ह्यात जुनी व्यापारपेठ मोठ्या प्रमाणात होती तशीच आजही काही प्रमाणात आहेच काही दिवसात मोंढा मार्केट मधील भाजीपाला यापुढे गोडाऊनच्या जागेत स्थलांतर करण्याचा निर्णय कृषी उत्पन्न बाजार समितीने घेतला आहे, असे जुगलशेठ लोहिया आपल्या भाषणात म्हणाले.

परळीच्या व्यापारपेठेत आज स्नेह मिलन संक्रातीच्या तिळगुळ घ्या गोड गोड बोला कार्यक्रम प्रसंगी अडत व्यापारी अध्यक्ष माऊली फड बोलताना म्हणाले की परळी शहरात आजही व्यापारात खरेदी विक्री चांगल्या प्रकारे चालत असून व्यापार्‍याच्या प्रश्नावर मी अडचण येऊ देणार नाही अशी ग्वाही देऊन कोणी एखाद्या संघटनेने बंद पुकारल्यास यापुढे बंद हा बारा वाजेपर्यंतच राहील असेही मत यावेळी अध्यक्षीय भाषणात बोलताना माऊली म्हणाले.

 याप्रसंगी पत्रकार संघाचे अध्यक्ष बालकिशन सोनी, पत्रकार अभिमन्यू फड गुलाब आप्पा शेटे, शांतीलाल जैन, सुरेश मुंडे, रिकबचंद कांकरिया, नवनिर्वाचित अध्यक्ष नंदकिशोर बियाणी, शंकरराव आडे पवार, बंडू शेठ गरड, विजय शेठ सामत, भीमराव सातपुते मामा, सुरेश टाक, कळसकर, रमेश भोईटे, तसेच विविध व्यापारी संघटनाचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक गोपाळ कंकाळ यांनी केले तर सूत्रसंचालन महेश मुंडे यांनी केले.

Sharing

Visitor Counter