मतदार ओळखपत्रासह मतदारांची ओळख पटविण्यासाठी

Beed

मतदार ओळखपत्रासह मतदारांची ओळख पटविण्यासाठी

पुढील पर्यायी कागदपत्रे ग्राह्य धरण्याचे आयोगाचे निर्देश

बीड/वार्ताहर 

भारत निवडणूक आयोगाचे दि. 29 डिसेंबर 2022 अन्वये महाराष्ट्र विधान परिषदेच्या 05 औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाच्या व्दिवार्षिक निवडणूक-2023 चा कार्यक्रम घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार दि. 30 जानेवारी 2023 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून निवडणूक मतदान केंद्रावर मतदान करतांना मतदारांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या ( EPIC) व्यतिरिक्त पर्यायी खालील कागदपत्रे पूरावा म्हणून धरण्याबाबत आयोगाने निर्देश दिले आहेत.

 

        आगामी विधानपरिषदेची व्दिवार्षिक पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक- 2020 याकरिता मतदान करताना मतदान केंद्रावर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ओळखपत्र (EPIC) सादर करु शकत नाहीत, अशा मतदारांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या (EPIC) व्यतिरिक्त पुढीलप्रमाणे पर्यायी कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी कळविले आहे.

 

      यामध्ये आधार कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, भारतीय पारपत्र, केंद्र/राज्य सरकार/सार्वजनिक उपक्रम/पब्लिक लिमिटेड कंपन्या यांनी कर्मचा-यंना जारी केलेल्या फोटोसह सेवा ओळखपत्र, खासदारांना/ आमदारांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र, संबधित शिक्षक आणि पदवीधर मतदार संघातील मतदार ज्या शैक्षणिक संस्थेत काम/ नोकरी करीत आहेत त्या शैक्षणिक संस्थानी जारी केलेले सेवा ओळखपत्र, विद्यापीठाव्दारा वितरीत मूळ पदवी/ पदविका प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले शारीरिक दिव्यांगत्वाचे मूळ प्रमाणपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने वितरित केलेले युनिक डिसॅबिलीटी ओळखपत्र (UDID) मतदारास वरील कागदपत्रापैकी एक ओळख कागदपत्र सादर करणे अनिवार्य राहील.           

Sharing

Visitor Counter