फार्मसी महाविद्यालयात इंन्डक्शन कार्यक्रम संपन्न

Beed

फार्मसी महाविद्यालयात इंन्डक्शन कार्यक्रम संपन्न

बीड/प्रतिनिधी

आदर्श शिक्षण संस्था, बीड द्वारा संचलित फार्मसी महाविद्यालयात इन्डक्शन कार्यक्रम गुरुवारी संपन्न झाला.सदरील कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त इम्रान हाशमी हे होते. या वेळेस मार्गदर्शन करताना हाशमी म्हणाले की, "Eat safety and safety foods" सुरक्षीत पणे खा व सुरक्षीत अन्न खा' असे हाशमी यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करतांना सांगितले. आपणास बाजारात मिळणाऱ्या अन्ना बाबत ही माहीती दिली तसेच हे अन्न किती सुरक्षीत आहे याबद्दल सविस्तर माहीती दिली.

टेलियस फार्मास्युटीकल्सचे संचालक गणेश शिंदे यांनी सध्या ट्रेन्डस इन फार्मास्युटीक विषयावर मार्गदर्शन केले. प्रा. एम. के. पटेल यांनी कार्यक्रमाचे संचलन केले. सदरील कार्यक्रमास फार्मास्युटिकल महाविद्यालयाचे सर्व स्टाफ तथा विद्यार्थी उपस्थित होते.

Sharing

Visitor Counter