लढा दुष्काळाशी फाउंडेशन च्या वतीने तीवगाव मकर संक्रात निमित्त वाण म्हणून झाडे आणि पुस्तके दिले

लढा दुष्काळाशी फाउंडेशन च्या वतीने तीवगाव मकर संक्रात निमित्त वाण म्हणून झाडे आणि पुस्तके दिले
तीगावच्या संरपच सौ. अर्चना राज पाटील.
लढा दुष्काळाशी फाउंडेशनच्या वतीने तीगावातील महिला सभेसाठी शेकडो महिलांचा सहभाग.
वडवणी/प्रतिनिधी
लढा दुष्काळाची फाऊंडेशनचे अध्यक्ष एडवोकेट राज पाटील यांच्या पत्नी सौ .अर्चनाताई राज पाटील या तिगावच्या सरपंच झालेल्या आहेत. गावोगावी जाऊन लोकांना झाडे वाटप करून वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविणारे राज पाटील यांनी
आपल्या गावात मकर संक्रातीच्या शुभपर्वावर महिलांची सभा बोलावली. आपल्या फाउंडेशनच्या वतीने त्यांनी या सभेमध्ये आलेल्या पाचशेहून अधिक महिलांना संक्रातीचे वाण म्हणून झाडांचे व पुस्तके वाटप केले. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
[लढा लष्कराची फाऊंडेशनचे अध्यक्ष राज पाटील हे तीगावचे रहिवासी आहेत. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये त्यांच्या पत्नी सौ अर्चना राज पाटील या सरपंच पदी विराजमान झालेल्या आहेत. मकर संक्रांतीच्या शुभपर्वावर राज पाटील यांनी सर्व महिलांची ग्रामसभा बोरवली. या सभेमध्ये लढा दुष्काळाशी फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी उपस्थित
असलेल्या सर्व महिलांना एक पुस्तक भेटवस्तू सह प्रत्येकी एक झाड वाटप केले. आपापल्या दारात झाडे लावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. पुस्तकाच्या माध्यमातून आपलं ज्ञान वाढवावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. गावातील सर्व महिलांनी एकत्र येऊन गावाच्या विकासाला हातभार लावावा गावामध्ये कोणी झाडे तोडू नये. जे झाड तोडायचे आहे त्याची रितसर परवानगी घ्यावी आणि एक झाड तोडायच्या अगोदर किमान पाच झाडे लावून ती वाढवावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले. गावाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध राहू. प्रत्येक महिलांनी आपापले प्रश्न हे सरपंचापर्यंत सांगितले पाहिजेत आणि सर्वांच्या सहकार्यातून गावाचा विकास साध्य केला पाहिजे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. लढा दुष्काळाशी फाउंडेशनच्या वतीने आयोजित या महिला सभेसाठी पिंपरखेडचे उपसरपंच तथा पत्रकार अशोक निपटे यांची उपस्थिती होती. यावेळी पत्रकार निपटे यांनी मार्गदर्शन करताना एडवोकेट राज पाटील सारखा माणूस तीगावचा सरपंच आहे हे तिगावसाठी अत्यंत भाग्याची बाब असल्याचे सांगितले गावकऱ्यांनी अशा व्यक्तिमत्त्वाचा लाभ विकासासाठी करून घेणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. यावेळी पत्रकार हनुमंत मात्रे यांनीही एडवोकेट राज पाटील यांनी केलेल्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. या कार्यक्रमासाठी एमडीएल चॅनलचे संपादक ओमप्रकाश साबळे, पत्रकार गितांजली लव्हाळे .यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.








