बीड मतदार संघातील विकास कामाची पुर्तता पालकमंत्री करणार या बाबत दुमत नाही-आ.संदीप क्षीरसागर

बीड मतदार संघातील विकास कामाची पुर्तता पालकमंत्री करणार या बाबत दुमत नाही-आ.संदीप क्षीरसागर
बीड/प्रतिनिधी
बीड जिल्हा आणि विशेषत: बीड मतदार संघ हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा किंवा मतदार संघ म्हणुन संपुर्ण महाराष्ट्रात ओळखला जात असून या मागे बेरोजगारी, विकास, रस्ते, नाली, पाणी, वीज आणि आवश्यक त्या सुविधापासून गेल्या अनेक दशकापासून वंचित असून मागील महाविकास आघाडीच्या काळापासून या भागामध्ये जन कल्याणाच्या अनेक योजना राबविण्यात आल्या होत्या. पण प्रस्थापितांच्या खोटारडेपणामुळे अनेक विकास योजनेचे स्थगिती देण्यात आलेली आहे. आता सत्तांतर झाले असून बीड मतदार संघातील विकास कामाबाबत सामान्य नागरिक ना.अतुल सावे यांच्याकडे आशेने पाहत असून मतदार संघातील समस्यांचे निरसन करण्यात दुमत करणार नाहीत या आशेने बीड जिल्हयासह बीड मतदार संघ पाहत आहेत.
या बाबत अधिक माहिती अशी की, जिल्हा नियोजन समितीची सर्वसाधारण बीड जिल्हा वार्षिक योजनांची प्रारुप आढावा बैठक आज बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बीड मतदार संघाच्या सर्वांगिण विकासाबरोबरच शेतकर्यांना पीकविमा मिळणे ही अत्यंत आवश्यक बाब आहे. अनेक शेतकर्यांना अद्यापपर्यंत पीकविमा मिळाला नाही त्यांना पीकविमा मिळावा तसेच शेतकर्यांना नवे जुने करून नवीन पीक कर्ज मिळण्याची व आवश्यक विकास कामांची प्रस्तावाद्वारे पालकमंत्री ना.अतुल सावे यांच्याकडे मागणी केली. बीड शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची उंची वाढवणे व सुशोभिकरण करणे बाबत बीड नगर पालिकेने अंदाजपत्रक आराखडा तयार करणे व अभियंता नियुक्ती करून लवकरत लवकर निविदा काढणे अशी मागणी केली. तसेच बीड पंचायत समिती आवारामध्ये स्व.आण्णासाहेब पाटील पुतळा बसवणे बाबतच्या प्रस्तावास मान्यता देऊन तात्काळ काम सुरु करणे. ग्रामीण व शहरी भागाच्या सुविधांसाठी पायाभूत कामे होणे गरजेचे आहेत. त्यासाठी लागणारा निधी तरतूद करावी व ग्रामीण रस्त्यांची जोडणी गतिमान करणे, बीड शहरात सध्या सुरु असलेल्या सिमेंट रस्त्यांसाठी निधीची तरतूद करणे, अनेक ठिकाणी सिमेंट रस्त्यांचे कामे सुरु आहेत कामात रस्त्यामध्ये लाईट पोल येतात. महावितरणच्या पोल शिफ्टिंग बाबत लागणार निधी मिळावा. बीड विधानसभा मतदारसंघात मागील महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर करण्यात आलेली पाली व अंजनवती येथील 33 के.व्ही.चे काम सुरु करावे, बीड व शिरूर कासार तालुक्यातील कृषी व सिंगल फेज डी.पी.देण्यात यावे. जिल्हाची धाकटी पंढरी श्री क्षेत्र नारायणगड येथील विकास कामांबाबतचे सर्व प्रश्न सोडवणे बाबत व मंजूर असलेल्या 23 कोटींच्या निधीची तरतूद होणे बाबत मा.पालकमंत्री महोदय, मा.जिल्हाधिकारी यांच्यासह शासनस्तरावरून तात्काळ बैठक आयोजित व्हावी. शहराचे ग्रामदैवत श्री क्षेत्र खंडेश्वरी देवस्थान, बीड पर्यटन विकास योजनेमध्ये समाविष्ट होण्यासाठी नियोजन विभागाच्या वतीने प्रस्ताव सादर करणे बाबत चर्चा करून बीड विधानसभा क्षेत्रातील तिर्थक्षेत्रांना ’क’ दर्जा देणे बाबतही मागणी केली. त्याचप्रमाणे पर्यटन स्थळ्यांच्या विकासासंदर्भात असणार्या योजनांसाठी वाढीव निधी मंजूर करण्यासंदर्भात यावेळी आ.संदीप क्षीरसागर यांनी पालकमंत्री ना.अतुल सावे यांच्याकडे प्रस्तावित केले आहे.








