प्रा.रुक्मिणीकांत पांडव यांना पी.एचडी प्रदान

प्रा.रुक्मिणीकांत पांडव यांना पी.एचडी प्रदान
बीड/प्रतिनिधी
येथील सावरकर महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागातील प्रा.रुक्मिणीकांत श्रीपादराव पांडव यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने नाट्यशास्त्र विभागात पी.एचडी. ही पदवी प्रदान केली आहे.
रुक्मिणीकांत पांडव यांनी बीड जिल्ह्यातील लोककला आणि लोककलावंतांच्या समस्या या विषयावर के.एस.के. महाविद्यालयातील नाट्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.संजय देवळाणकर यांच्या मार्गदर्शनाखाली शोध प्रबंध सादर केला. रुक्मिनीकांत याच्या यशाबद्दल माजी नाट्यशास्त्र विभाग प्रमुख जयंत शेवतेकर, नाट्यशास्त्र विभाग प्रमुख स्मिता साबळे, भा.शि.प्र.चे अध्यक्ष डॉ.सुरेंद्र आलुरकर, कार्यवाह डॉ.हेमंत वैद्य, मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रा.चंद्रकांत मुळे, कोषाध्यक्ष सत्यनारायणजी लोहिया, केंद्रीय कार्यकारीणी सदस्य उमेश जगताप, सावरकर संकु लाचे अध्यक्ष गजानन जगताप, कार्यवाह डॉ.विवेक पालवणकर, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रिती पोहेकर, उपप्राचार्य डॉ.लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर, उपप्राचार्य डॉ.राजेश ढेरे, कार्यालय अधीक्षक डॉ.प्रशांत तालखेडकर, संपादक इसाक अहेमद, डॉ.राजु पाटोदकर, मधुकर क्षीरसागर, नंदकुमार पांडव, रेहान शेख, मंगेश निटुरकर, डॉ.तुकाराम देवकर, फिरोज काझी, शेख शफीयोद्दीन गुड्डु तथा सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, मित्र परिवार, आप्तेष्ट, नातेवाईकांनी अभिनंदन केले आहे.








