पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून नाळवंडी ते ढेकणमोहा रस्ता मंजुर-आ.संदीप क्षीरसागर

Beed

पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून नाळवंडी ते ढेकणमोहा रस्ता मंजुर-आ.संदीप क्षीरसागर
 

पंतप्रधान सडक योजने अंतर्गत प्रस्तावित 26 कोटी 32 लक्ष रूपयांचे तर मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत 7 रस्ते प्रस्तावित
 

बीड/प्रतिनिधी

बीड मतदार संघात पंतप्रधान ग्रामसडक योजने अंतर्गत 26 कोटी 32 लक्ष रूपये किंमतीचे रस्ते प्रस्तावित केले होते. त्यापैकी नाळवंडी ते ढेकणमोहा या 3 कोटी 32 लक्ष रूपयांच्या रस्त्यात मंजुरी मिळाली असल्याची माहिती आ.संदीप क्षीरसागर यांनी प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, बीड मतदार संघातील ग्रामीण भागाच्या रस्त्याची समस्या खुप मोठी असून या संदर्भात ग्रामस्थ वारंवार मागणी करत होते. या बाबतीत पाठपुरावा करून आ.संदीप क्षीरसागर यांनी पंतप्रधान ग्रामसडक योजने अंतर्गत बीड मतदार संघातील एन.एच.361 एफ खापर पांगरी-तळेगाव-चौरेवस्ती- पालवण 7 कि.मी. 6 कोटी 87 लाख, एन.एच.0581 नाळवंडी ते ढेकणमोहा 4.20 कि.मी. 3 कोटी 32 लक्ष, एन.एच.0582 धुमाळवाडी-चर्‍हाटा-तिप्पटवाडी-लिंबारूई-पारगाव सिरस 3.70 कि.मी. 3 कोटी 64 लक्ष, एन.एच.05106 सावरगाव घाट ते तलवडेवस्ती-बावी-चौसाळा 4.30 कि.मी. 3 कोटी 84 लक्ष, एन.एच.0569 खोकरमोहा ते तागडगाव-पाडळी 8.90कि.मी. 8 कोटी 63 लक्ष असे एकूण 26 कोटी 32 लक्ष रूपयांचे रस्ते पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून प्रस्तावित केले होते. त्यापैकी नाळवंडी ते ढेकणमोहा 4 कि.मी.चा 3 कोटी 32 लक्ष रूपयांचा रस्ता मंजुर झाला असून तसेच महाराष्ट्र शासनाकडे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत एन.एच.361 एफ ढेकणमोहा-काळेगाव हवेली-इट-गुंधा-लोणी शहाजानपुर एमडीआर 18 कि.मी.6.50, एन.एच.361 एफ मोची पिंपळगाव-वायभटवाडी-कोल्हारवाडी कि.मी.12, एन 52 बीडजवळ आहेर धानोरा-पाली कि.मी. 6, एन.एच.52 शिदोड ते अंथरवणप्रिपी कि.मी.6, एन.एच.361 एफ मैंदाजवळ मैंदा तांडा ते साडसोन्ना एस.एच.55 कि.मी.7, एन.एच.361 एफ ब्रह्मगावजवळ मौजवाडी ते कुटेवाडी कि.मी.6.25, एमडीआर 18 टेंबी-कणसेवस्ती कि.मी.4 या प्रस्तावित रस्त्या बाबतीत नुकतीच मुंबई येथे आ.संदीप क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे. येणार्‍या काळात हे प्रस्तावित रस्ते देखिल मंजुर होणार असून यामुळे बीड मतदार संघातील ग्रामीण भागाचे अर्थकरणाच्या चक्रास चालना मिळणार आहे. बीड मतदार संघात पंतप्रधान ग्रामसडक योजना व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून जास्तीत जास्त रस्ते होणार असल्याची माहिती आ.संदीप क्षीरसागर यांनी प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.

Sharing

Visitor Counter