माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते
भास्करराव जाधव, अशोकराव शेटे यांचा सत्कार
बीड/प्रतिनिधी
माजी मंत्री तथा गजानन नागरी सहकारी बँकेच्या वतीने बँकेचे चेअरमन जयदत्तअण्णा क्षीरसागर यांनी बीड जिल्हा व्यापारी महासंघाचे नूतन जिल्हाध्यक्ष भास्करराव जाधव आणि कार्याध्यक्ष अशोकराव शेटे यांचा कार्यकारणी वर निवड झाल्याबद्दल सत्कार केला व शुभेच्छा दिल्या.
गजानन बँकेच्या सभागृहात झालेल्या या सत्कार समारंभावेळी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी व्यापारी महासंघाच्या पदाधिकार्यांशी चर्चा केली. यावेळी भास्करराव जाधव व अशोकराव शेटे यांनी व्यापार्यांच्या विविध प्रश्नांची त्यांना माहिती दिली. क्षीरसागर यांनी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करण्यासाठी आपण नेहमीच संघटनेसोबत असल्याची ग्वाही यावेळी दिली. कार्यक्रमास बँकेचे मुख्य व्यवस्थापक क्षीरसागर, तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकरराव कदम, बँकेचे संचालक अॅड. डोईफोडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बबनराव गोरे यासह बँकेचे उपाध्यक्ष जगदीश काळे, संचालक प्रा.हेरकर सर, राजेंद्र मुनोत, अरुण नाना डाके, धनंजय वाघमारे, तांगडे, दत्तात्रय आघाव यासह बँकेचे अधिकारी वर्ग उपस्थित होते.








