बुखारी उर्दू शाळेची नैसर्गिक सहल संपन्न
Beed

बुखारी उर्दू शाळेची नैसर्गिक सहल संपन्न
माजलगाव/प्रतिनिधी
येथील बुखारी उर्दू प्राथमिक शाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांची नैसर्गिक सहल संपन्न झाली.सदरील सहली माजी नगरसेवक नासर खान यांच्या फार्म हाऊस वर नेण्यात आली जेथे नासर खान यांचे भाऊ अन्सर खान यांनी मुलांना निसर्गाचा परिचय करून दिला.अनेक फळांची,भाज्यांचे प्रकार व झाडं आणि मातीचे प्रकार विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले.विद्यार्थ्यांनी खुप अनुभव घेतला आणि खुप मौजमजा केली.सहलीत बुखारी उर्दू प्राथमिक शाळेचे शिक्षक पठाण माजेद खान व मोहंमद खान सर व दोन शिक्षिकांच्या सहकार्या ने यशस्वी झाली.यावेळी शाळेचे सचिव खुर्शीद नाईक साहेब मुख्याध्यापक नवीद सर यांनी सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या
