चुकून दुसऱ्याच्या खात्यावर आँनलाईन गेलेले पैसे परत मिळवले

Beed

चुकून दुसऱ्याच्या खात्यावर आँनलाईन गेलेले पैसे परत मिळवले

बीड/वार्ताहर

   अर्जदार शेख शहाबाज करीम, रा. हिंगणी हवेली, तालुका जिल्हा बीड, हे शेतकरी असून त्यांस त्यांच्या मित्रा स पैसे पाठवायचे होते. परंतु यांच्याकडुन चुकीने एका दुसऱ्याच्या अकाउंट वर पैसे गेले होते. सदरील रक्कम फोन पे द्वारे पाठवण्यात आली होती. सात दिवसांपूर्वी त्यांनी अर्ज केला होता.. 5 दिवसांत त्यास रक्कम परत मिळाली आहे. त्यांनी सायबर विभागास तक्रार केली होती . सायबर पोलीस ठाणे यांनी तत्परतेने कार्यवाही करून, सबंधित खातेदार याचा शोध घेतला आणि उचित कार्यवाही करून तक्रार दाराचे पैसे पुन्हा परत मिळवून दिले आहे. यावरून तक्रारदाराने पोलिसांचे कामगिरी बद्दल समाधान व्यक्त केले आहे. 

    तरी याशिवाय आँनलाईन अनोळखी कॉल / मेसेज / जाहिरात जो तुम्हास काही लालुच दाखवत आहे, मदतीचा भाव आणत आहे, येनकेन प्रकारे तुम्हास तुमची ATM/ क्रेडिट कार्ड, बँक अकाऊंट, UPI याची माहिती विचारत आहे, लॉटरी/ बक्षीस याचे आमिष दाखवत आहे, एखादी स्कीम आपल्यास देत आहे, लोन देत आहे यास बळी पडू नये असे आवाहन पोलिस अधीक्षक श्री नंदकुमार ठाकूर, आणि अपर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर यांनी केले आहे आणि असे काही आढळून आल्यास तक्रार देण्याचे सुचवले आहे.

Sharing

Visitor Counter