अपघात न होण्यासाठी आपला ताबा एसटीवर असावा-पो.नि.सुरेश चाटे

Beed

अपघात न होण्यासाठी आपला ताबा एसटीवर असावा-पो.नि.सुरेश चाटे

रा.प. परळी आगार मध्ये सुरक्षितता अभियान कार्यक्रम साजरा-भोंडवे

बीड/वार्ताहर

रा.प. परळी आगार मध्ये सुरक्षितता अभियान कार्यक्रम साजरा करण्यात आला या प्रसंगी संभाजी नगर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक चाटे साहेब यांनी फित कापून उद्घाटन केले. यावेळी बोलताना पो.नि.सुरेश चाटे म्हणाले की, अपघात न होण्यासाठी आपला ताबा एसटीवर असावा, प्रवास जवळचा असो की लांब पल्ल्याचा आपण आपले नियंत्रण ठेवून सुरक्षित कसे वाहन चालविता येईल यावर लक्ष केंद्रित करावे. याकरीता काही महामंडळाच्या अडचणी असल्या तर यावर स्वत: चालकाने मात करून स्वत: मार्ग काढावा असे सुरक्षा सप्ताह निमित्त मार्गदर्शनपर भाषणात बोलताना म्हणाले.

तसेच व्यासपीठावर पत्रकार संघाचे अध्यक्ष बालकिशन सोनी म्हणाले की, पूर्वीच्या रस्त्यात एकच वाहन रोडवर चालत होते, त्या वाहनात आता वाढ झाली असून एसटी चालत असताना इतर वाहनांचा त्रास होणार नाही याची दखल चालकाने घेणे गरजेचे झाले आहे. कारण की रस्ते अरुंद राहिलेले आहेत याची चालकाने दखल घ्यावी त्यामुळे अपघात होणार नाहीत या सप्ताहप्रसंगी सांगितले.

परळीचे डेपो मॅनेजर प्रविण भोंडवे मार्गदर्शनपर भाषण करताना म्हणाले की, सर्व कोरोना काळानंतर, संप काळानंतर आपण चालक, वाहक सर्वांच्या मर्जीतून एसटी चालवताना मार्ग काढून साहित्य नसतानाही एसटीच्या अडचणी असताना चालकांनी लांब पल्ल्याच्या गाड्या चालून एसटीच्या चालकाकडून प्रवाशांना सुरक्षित आणण्यासाठी मान उंचावून प्रवास केल्याबद्दल आहे त्या परिस्थितीत कारभार सांभाळून मी डेपोचे पालक या नात्याने मेकॅनिकल, चालक, वाहक यांचा सुरक्षा सप्ताहात मोठा मोलाचा वाटा आहे. तसेच या सप्ताहनंतरही दुसर्‍या महिन्यात वर्षभराच्या काळात अपघात होणार नाही याचीही काळजी चालकाने घ्यावी.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राम जोशी यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रा प कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या सप्ताहप्रसंगी गोदाम, बिडवे, शिंदे पोलीस यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

Sharing

Visitor Counter