आ.संदीप क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून साकार होतयं गोरगरीबांच्या घराचे स्वप्न!

आ.संदीप क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून साकार होतयं गोरगरीबांच्या घराचे स्वप्न!
मतदार संघात 3164 घरकुल मंजूर;अनेक ठिकाणी घरकुलाचे काम प्रगतीपथावर
बीड/प्रतिनिधी
प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते की आपले छोटेसे का होईना हक्काचे आणि मजबूत बांधकामाचे घरकुल असावे याकरिता शहरी व ग्रामीण भागातील माता-भगिनी नागरीक सतत घरकुल बाबतीत प्रश्न मांडीत होते.
याबाबत केंद्र शासन आणि राज्य शासनाकडे आ.संदीप क्षीरसागर यांनी पाठपुरावा करून केंद्र शासना अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेतून 2060 आणि राज्य शासनाच्या रमाई आवास योजनेतून 1104 घरकुल 2021-2022 अंतर्गत बीड मतदार संघात मंजूर करून आणले असुन अनेक ठिकाणी घरकुलाचे काम प्रगतीपथावर आहेत. उर्वरित लाभार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करावा जेणेकरून आपल्या मंजुर घरकुलाचा धनादेश टप्प्या टप्प्याने आपल्याला वितरीत केला जाईल. सदरील धनादेश हा आपल्या घरकुलासाठीच खर्च करावा जेणेकरून आपल्याला व आपल्या परिवाराला ऊन,वारा,पावसापासुन बचाव करण्यासाठी मजबूत घरटे होईल. अधिकार्यांशी आणि कुठल्याही खासगी व्यक्तीशी घरकुलाच्या बाबतीत आर्थिक व्यवहार करू नये. अधिकार्यांशी सहकार्य करत आवश्यक त्या कागदपत्राचा पुरावा ऑनलाइन पद्धतीने दाखल करून आपल्या मंजूर घरकुलाचा धनादेश पंचायत समिती मार्फत प्राप्त करून घ्यावा. ही योजना आपल्या हक्काच्या मजबूत घरासाठी असून राज्य व केंद्र शासनाची ही घरकुल योजना पंचायत समिती,बीड यांच्या देखरेखी खाली चालते. लाभार्थ्यांना धनादेश घरकुलासाठीच उपयोग करून आपले स्वप्नाचे मजबूत घरटे पुर्ण करुन घ्यावा असे आवाहन आ.संदीप क्षीरसागर यांनी बीड मतदार संघातील लाभार्थ्यांना केले आहे.
