विविध क्षेत्रातील युवकांना प्रोत्साहित करण्यात पत्रकारांचा मोठा वाटा - अमोलराजे शिंदे

Beed

विविध क्षेत्रातील युवकांना प्रोत्साहित करण्यात पत्रकारांचा मोठा वाटा - अमोलराजे शिंदे

आष्टी/प्रतिनिधी

 समाजाला दिशा देण्याचे, समाजाला मार्गदर्शन करण्याचे, समाजातील त्रुटींवर बोट ठेवण्याचे काम पत्रकारांचे आहेच .त्याचबरोबर समाजातील विविध क्षेत्रातील युवकांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात प्रोत्साहित करण्याचे काम देखील पत्रकार मंडळी करत असतात त्यामुळे त्यांचे विषयीच्या आपुलकीमुळे त्यांचा सत्कार करणे हे आपले कर्तव्य आहे असं समजतो असे प्रतिपादन राजे संभाजी उद्योग समूहाचे अध्यक्ष पैलवान अमोल राजे शिंदे यांनी केले.

 आष्टी येथील त्यांच्या खडकत चौकातील संपर्क कार्यालयामध्ये दर्पणनिमित्त पत्रकार यांच्या आयोजित सत्कार समारंभमध्ये ते बोलत होते ..

ते पुढे म्हणाले की, युवकांना योग्य वयात मार्गदर्शन मिळाल्यास त्याचा चांगला उपयोग होऊन युवक कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात समाजातील घडामोडींवर पत्रकारांचे निरीक्षण असते त्यामुळे सद्गुण आणि दुर्गुण याबाबत त्यांचे मार्गदर्शन मोलाचे असते.

 सतत कार्यरत असणाऱ्या पत्रकारांचे समाजासाठी फार मोठे योगदान आहे त्याची उतराई म्हणून हा सत्कार करत असल्याचे त्यांनी शेवटी बोलताना सांगितले. यावेळी जेष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे, आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कदम,अनिरुद्ध धर्माधिकारी,संतोष दाणी, राजेंद्र लाड, जावेद पठाण, संतोष नागरगोजे, आण्णासाहेब साबळे,अक्षय विधाते ,सतिश जगदाळे,सोमनाथ जगताप, ऋषिकेश घिगे,बंटी आनेराव,सलिम पठाण,शुभम बोरा,साहिल शेख, सरपंच विनोद खेडकर,राहुल घोडपडे आदी उपस्थित होते.

Sharing

Visitor Counter