के.एस.पी. विद्यालयामध्ये राजमाता जिजाऊसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली

के.एस.पी. विद्यालयामध्ये राजमाता जिजाऊसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली
बीड/प्रतिनिधी
दि.12/01/2023 रोजी शहरातील(कर्मयोगिनी सावित्रीबाई फुले विद्यालय) केएसपी विद्यालयामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये के.एस.पी. विद्यालयामध्ये राजमाता जिजाऊसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती गुरुवार रोजी विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. मुलांना प्रॉजेक्टर वर कार्याची माहिती दाखवण्यात आली, मुलांनी वेगवेगळी वेशभूषा करून आज विध्यार्थी शाळेत दाखल झाले तसेच मुलांनी भाषण तसेच गाणी म्हणाले.यावेळी कार्यक्रमाला सौ.अंजलीताई शेळके मॅडम, शाळेचे प्र.मुख्याध्यापक श्री.विशाल सुपेकर, या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.युगंधर तुपे, अध्यक्ष म्हणून सौ.बावळे मॅडम यांची उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाचे प्रस्थाविक सौ.ढेले मॅडम यांनी केले.
यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन करतांना म्हटले की, बारा जानेवारी हा योगायोगाने प्रखर हिंदुत्ववादी दिवस आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मोगलांच्या जुल्मी सत्तेच्या अराजकतेच्या काळात आपले हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी सर्वार्थाने सर्व क्षेत्रात पारंगत करुन शिवारायांना घडविणाऱ्या राजमाता जिजाऊंचा व इंग्रजांच्या जुल्मी राजवटीत संपूर्ण जगाला हिंदू धर्माचे महत्त्व पटवून देणारे व सशक्त बलवान तरुण पिढीचा आग्रह धरणारे स्वामी विवेकानंद या दोन महान व्यक्तीमत्वांचा जन्मदिवस.अशा दिवशी शिक्षण व कला क्षेत्रात संस्कारक्षम पिढी घडवून त्यांना स्वावलंबी बनण्याची प्रेरणा देणाऱ्या शिक्षिकांना मानाचा मुजरा असे उद्गार श्री युगंधर तुपे यांनी काढले.








