शेतकरी बांधव,पुशपालक,बेरोजगार युवक,युवती आणि महिलांनी पशुसंवर्धन योजनेचा लाभ घ्यावा-आ.संदीप क्षीरसागर

Beed

शेतकरी बांधव,पुशपालक,बेरोजगार युवक,युवती आणि

महिलांनी पशुसंवर्धन योजनेचा लाभ घ्यावा-आ.संदीप क्षीरसागर

बीड/प्रतिनिधी

राज्य शासनाने पशुसंवर्धन विभागा अंतर्गत ग्रामीण भागातील शेतकरी, बेरोजगार, युवक, युवती, महिला आदींना स्वयंरोजगाराची मोठी संधी करून दिली असून पशुधन जपण्यासह ग्रामीण भागातील जनतेसाठी उपजीविकाचे साधन निर्माण करून दिले असून याचा लाभ मोठ्या प्रमाणावर घ्यावा आ.संदीप क्षीरसागर यांनी केले आहे.

याबाबतीत अधिक माहिती अशी की,महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील आर्थिक चक्र गतिमान होण्यासाठी राज्य शासनाने पशुसंवर्धन विभागा अंतर्गत विविध योजनांची घोषणा करून ग्रामीण भागात रोजगाराची मोठी संधी उपलब्ध करून दिली असून त्यानुसार नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत दुधाळ गाय, म्हशीचे गट वाटप करणे, शेळी मेंढी गट वापर करणे, 1000 मांसल कुकुट पक्षाच्या संगोपनासाठी निवारा शेठ उभा करणे, अर्थसहाय्य देणे,100 कुकुट पिलांचे वाटप आणि 25+3 तलंगा गट वाटप आदी योजनेसाठी ऑनलाइन पद्धतीने निवड प्रक्रिया 2022/2023 या वर्षात राबविली जाणार असून पशुपालन, डेअरी, कुक्कुटपालन, शेळी मेंढी पालन यापैकी कुठल्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधव, बेरोजगार युवक युवती महिलांने ऑनलाइन पद्धतीने राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या Playstore वरून AH.MAHABMS डाऊनलोड करून https.//ah mahabms या संकेतस्थळावर दिनांक 11.1.2023 अर्ज करावेत. ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांसाठी बेरोजगार युवक युवतीसाठी आणि महिलांसाठी ही स्वयंरोजगाराची मोठी संधी असून आपल्या उज्वल भविष्यासाठी हि योजना वरदान ठरणार असून ग्रामीण भागातील जनतेने या संधीचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा.अर्ज करण्याची पद्धत अत्यंत सोपी आणि सरळ असून अधिक माहितीसाठी पशुसंवर्धन विभागात जाऊन संपर्क साधावा असे आवाहन आमदार संदीप क्षीरसागर यांनी केले आहे.

Sharing

Visitor Counter