व्हॉईस ऑफ मीडियाकडून सोमवारी सेवानिवृत्त पत्रकारांचा बीडमध्ये सत्कार

व्हॉईस ऑफ मीडियाकडून सोमवारी सेवानिवृत्त पत्रकारांचा बीडमध्ये सत्कार
- ज्येष्ठ विचारवंत अमर हबीब यांच्या व्याख्यानाचे आयोजन
बीड/प्रतिनिधी
दि.7 : दर्पण दिनानिमित्त ‘व्हॉईस ऑफ मीडिया’कडून सोमवारी सेवानिवृत्त पत्रकारांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्या निमित्ताने ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक अमर हबीब यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक कार्यारंभचे संपादक शिवाजीराव रांजवण यांची उपस्थिती असणार आहे.
ज्यांनी पत्रकारितेत आपली हयात घालवली, बीडची पत्रकारिता समृध्द केली अशा सेवानिवृत्त पत्रकारांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे. त्यात ज्येष्ठ पत्रकार श्री.अशोकराव देशमुख, श्री.जगदीश पिंगळे, श्री.दगडू पुरी, श्री.रवींद्र देशमुख, श्री.प्रमोद कुलकर्णी यांचा समावेश आहे. सोमवारी दुपारी एक वाजता बस स्टॅन्ड पाठीमागील डीपी रोडवरील तुलसी संगणक शास्त्र महाविद्यालयात हा कार्यक्रम होत आहे. शहरातील पत्रकारांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन व्हॉईस ऑफ मीडियाचे राज्य उपाध्यक्ष संजय मालाणी, कार्यारंभचे कार्यकारी संपादक तथा व्हॉईस ऑफ मीडियाचे बीड जिल्हाध्यक्ष बालाजी मारगुडे, जिल्हा कार्याध्यक्ष दिनेश लिंबेकर, संतोष कानडे, उपाध्यक्ष जालींदर धांडे, भागवत जाधव, अमोल जाधव, विनोद जिरे, सरचिटणीस प्रभात बुडूख, कार्यवाहक उदय नागरगोजे, केशव कदम, प्रवक्ते गणेश सावंत रांजणीकर, सह सरचिटणीस सुनील यादव, कोषाध्यक्ष अनंत वैद्य, संघटक अनिल जाधव, एजाज शेख, अमोल मुळे, ज्ञानेश्वर वायबसे, प्रसिध्दी प्रमुख शुभम खाडे, सदस्य संजय तिपाले, शिरीष शिंदे, मुकेश झणझणे यांनी केले आहे.








