के.एस.पी विद्यालयाला प्राथमिक शिक्षण अधिकारी श्रीकांत कुलकर्णी साहेब यांची सदिच्छा भेट

के.एस.पी विद्यालयाला प्राथमिक शिक्षण अधिकारी श्रीकांत कुलकर्णी साहेब यांची सदिच्छा भेट
प्रतिनिधी/बीड
दि.07/01/2023 रोजी कर्मयोगिनी सावित्रीबाई फुलें विद्यालयाला आज सदिच्छा भेट दिली व शाळेकडून विद्यार्थ्यांसाठी राबविले जाणारे विविध उपक्रमाबद्दल माहिती जाणून घेतली यावेळी शाळेच्या संस्थाध्यक्ष सौ. अंजलीताई शेळके शिवछत्रपती पुरस्कार विजेते जे.पी.शेळके प्र.मुख्याध्यापक विशाल सुपेकर व शाळेतील शिक्षक कर्मचार्यांच्या उपस्थितीत त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी मान्यवरांनी भाषणात बोलतांना विद्यार्थी व शिक्षकाला यावेळी मार्गदर्शन करण्यात आले त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबाबत मुलांनाही मार्गदर्शन करण्यात आले यावेळी शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन त्यांचा सर्वांगीण विकास कसा वाढवता येईल याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.तर सूत्रसंचालन श्री गणेश शिंदे यांनी केले तर समग्र शिक्षा विभाग प्रमुख ऋषीकेशजी शेळके यांनी आभार मानले.








