शुभांगी नांदगावकर शिवसेनेच्या संपर्क संघटिकापदी नियुक्त

शुभांगी नांदगावकर शिवसेनेच्या संपर्क संघटिकापदी नियुक्त
मुंबई/प्रतिनिधी
हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या आदेशानुसार बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या महिला आघाडी संपर्क संघटिकापदी (कार्यक्षेत्र पूर्व विदर्भ) नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीचे विदर्भासह महाराष्ट्रात सर्वत्र स्वागत होत आहे.
वंदनीय हिंदुरुदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची सामाजिक शिकवण याचा प्रचार आणि प्रसार सक्षमपणे करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या निकटवर्तीय भगिनी शुभांगी दत्ता नांदगावकर यांची पूर्व विदर्भच्या संपर्क संघटिका पदी बाळासाहेबांची शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनी नियुक्ती केली आहे.या निवडीबद्दल विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रातून महिला आघाडी संपर्क संघटिका शुभांगी नांदगावकर यांचे अभिनंदन होत आहे. या निवडीबद्दल मराठवाड्यातून शेख आयेशा यांनी शुभांगी नांदगावकर यांना आगामी राजकीय यशस्वी वाटचालीबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.








