मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी तक्रार व बातमीची घेतली दखल

मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी तक्रार व बातमीची घेतली दखल
आसेफ़नगर चा मुख्य रस्ता व नाला बांधकामाची केली पाहणी
बीड/प्रतिनिधी
शहराच्या मध्यभागी असलेल्या आसेफ़नगर येथील मुख्य रस्त्याचे व नाल्याचे काम गेल्या दोन महिन्यांपासून अतिशय संथ गतीने सुरू आहे तसेच मोठ्या हलगर्जीपणाने निकृष्ट काम केले जात असल्याने याविषयी दिनांक १ जानेवारी २०२३ रोजी बीड नगर परिषद च्या नवनियुक्त मुख्याधिकारी श्रीमती नीता अंधारे यांना येथील सर्व वस्तूस्थिती विषद करून मुक्तपञकार एस.एम.युसूफ़ यांनी तक्रार केली होती. तसेच दिनांक २ जानेवारी २०२३ रोजी प्रसिद्धी माध्यमातून "रस्ता व नाल्याचे निकृष्ट काम; गुत्तेदाराला सूचना करूनही डोळेझाक" 'नवनियुक्त मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्याकडे तक्रार' या शीर्षकाने बातमी ही प्रकाशित केली होती.
याची दखल घेत मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी दिनांक ३ जानेवारी २०२३ रोजी बीड नगर परिषदेचे अभियंता, अधिकारी आणि कर्मचारी असा लवाजमा घेऊन आसेफ़नगर च्या या मुख्य रस्त्याची व नाला बांधकामाची पाहणी करून गुत्तेदाराला काँक्रिटीकरण गुणवत्ता पूर्ण करा, काम झालेल्या रस्त्यावर वेळोवेळी पाणी मारा, शिवाजीनगर पोलीस ठाणे संरक्षक भिंती लगत असलेली झाडे मुळासकट तोडा किंवा लिक्विड टाकून जाळा असे निर्देश दिले.
मुख्याधिकारींच्या या सूचनांवर गुत्तेदार रणजीत क्षीरसागर यांनी रस्त्याच्या दुसऱ्या लेयर वर सिमेंटचे आळे तयार करून पाणी टाकण्यात येईल तसेच शिवाजीनगर पोलीस ठाणे संरक्षक भिंत व नाल्याच्या नवीन तयार केलेल्या भिंतीमध्ये असलेल्या तिन्ही झाडांना व पूर्वी अर्धवट सोडलेल्या खोडांना तोडून त्या जागी असलेल्या झाडांचे मूळ पुन्हा फुटू नये म्हणून केमिकल टाकून जाळून टाकू असे म्हटले.
यामुळे केलेल्या तक्रार व बातमीची दखल घेऊन नवनियुक्त मुख्याधिकारी श्रीमती नीता अंधारे यांनी प्रत्यक्ष येऊन पाहणी करत आवश्यक चांगले व दर्जेदार काम करण्याचे निर्देश गुत्तेदारांना दिल्याने या प्रश्नी तक्रार करणारे मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी मुख्याधिकारी यांचे आभार मानले. यावेळी ज्येष्ठ पञकार काशीद मामा यांच्यासह आसेफ़नगर मधील शेख अखलाख, सय्यद नासिरुद्दीन, अब्दुल जब्बार खान, शेख मुबीन उपस्थित होते.








