जिल्हा परिषद बांधकाम विभागातील कर्मचारी यांचे पगार एक ते पाच तारखे पर्यंत करा-बळीराम उबाळे

जिल्हा परिषद बांधकाम विभागातील कर्मचारी यांचे पगार एक ते पाच तारखे पर्यंत करा-बळीराम उबाळे
पाटोदा/प्रतिनिधी
आज दिनांक 03/01/2023 रोजी जिल्हा परिषद बांधकाम विभागातील सर्व कर्मचारी व जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे सर्व पदाधिकारी यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.अजित पवार साहेब यांची भेट घेतली व जिल्हा परिषद बांधकाम विभाग व सर्व तालुकास्तरीय बांधकाम विभाग मधील कर्मचारी यांचे वेतन दोन ते तीन महिने मिळत नाही या मुळे कर्मचारी आर्थिक संकटात सापडत आहेत.
जिल्हा परिषद मधील बांधकाम विभागाच्या सर्व जिल्हास्तर,तालुका स्तरीय बांधकाम उपविभाग व अकरा पंचायत समिती मध्ये कार्यरत असणारे शाखा अभियंता,कनिष्ठ अभियंता,स्थापत्य अभियांत्रिकी सहायक,वरीष्ठ सहायक,कनिष्ठ सहायक,परिचर व इतर कर्मचारी यांचे वेतन वेळेवर मिळत नसल्यामुळे बांधकाम विभागातील सर्व कर्मचारी यांचे गृहकर्ज व इतर हफ्ते वेळेवर कपात होत नाहीत त्याचा व्याजाचा भूदृड सोसावा लागत आहेत व त्याचा परिणाम सिबिल स्कोर वर होत आहे.
सदर कर्मचारी यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे चौकशी केली असता निधी ची तरतूद उपलब्ध नाही अशी माहिती मिळते.निधी उपलब्ध असेल तर जिल्हा निहाय निधी वाटपाचे पत्र मुंबई वरून प्राप्त होत नाही.अशी माहिती मिळते
याबाबत जिल्हा परिषद कर्मचारी महासंघा मार्फत कार्यासन अधिकारी सा.बा विभाग मंत्रालय मुंबई,व अधीक्षक अभियंता परिमंडळ उस्मानाबाद यांना वेळोवेळी पत्रव्यव्हार केलेला आहे.त्याची अद्याप पर्यंत दखल घेतलेली दिसून येत नाही.त्यामुळे बांधकाम विभागातील कर्मचारी मध्ये नाराजी चे वातावरण तयार झाले आहे.तरी बांधकाम विभागातील कर्मचारी यांची वेतनाची त्रुटी तात्काळ दूर करून कर्मचाऱयांना एक ते पाच तारखे पर्यंत वेतन देण्यात यावे याबाबत मा.मु.का.अ अजित पवार साहेब याना जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ DNE 132 जिल्हा शाखा बीड च्या वतीने जिल्हाध्यक्ष बळीराम अण्णा उबाळे,सरचिटणिस नंदकिशोर परळकर,उपाध्यक्ष अशोक चव्हाण ,जिल्हा संघटक विलास बहिरवाळ,सहसचिव प्रदीप बनकर,बीड तालुका अध्यक्ष अरविंद दुबाले,हेंद्रे साहेब ,श्री आंधळे साहेब,मांडोत साहेब,रासकर साहेब,गुळवे साहेब,ओंकार उबाळे आदींनी निवेदन देऊन वेतन वेळेवर करण्याची मागणी केलेली आहे.व यावेळी मा.मु.का.अ अजित पवार यांनी याबाबत योग्य तो पत्रव्यव्हार तात्काळ केला जाईल असे स्कारातमक आश्वासन जि.प कर्मचारी महासंघ यांना दिले.








