मजुराचा जीव घेणाऱ्या ट्रकचा शोध सुरू ;तपास अधिकारी सौंदरमल यांची माहिती

Beed

मजुराचा जीव घेणाऱ्या ट्रकचा शोध सुरू ;तपास अधिकारी सौंदरमल यांची माहिती

बीड/वार्ताहर 

बार्शी नाका चौकात मजुराला धडक देऊन त्याच्या मृत्यू कारणीभूत ठरलेला ट्रक घटनास्थळावरून निघून गेला सदर ट्रक तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनीच सोडून दिल्याची चर्चा होत असताना अपघात होऊन पाच दिवस झाले तरी पोलिसांना अध्याप तो ट्रक मिळाला नाही या संदर्भात या प्रकरणातील तपास अधिकारी सौंदरमन यांच्याशी चर्चा केली असता ट्रक चा शोध घेण्यासाठी आरटीओ कार्यालयाची मदत घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

या संदर्भात अधिक माहिती अशी की 24 डिसेंबर रोजी संध्याकाळी बार्शी नाका चौकामध्ये एका 14 टायरच्या ट्रकने उत्तराखंडमधील मूळ रहिवासी असलेल्या मजुराला जोराची धडक दिली जखमी झालेल्या प्रेमराव याला जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारदरम्यान त्याचा मृत्यू झाला विशेष बाब म्हणजे घटनास्थळी पोलीस दाखल झाली तेव्हा अपघातातील जखमी प्रेमराव आणि अपघातास कारणीभूत असलेला ट्रक चालकासह घटनास्थळी होता जखमीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर ट्रक घटनास्थळावरून पसार झाला सदर ट्रेकला पोलिसांनीच सोडून दिल्याचे बोलले जात असताना या प्रकरणात तीन दिवसानंतर म्हणजे 27 डिसेंबर रोजी संध्याकाळी पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला यावेळी तक्रारीमध्ये ट्रक घटनास्थळावरून निघून गेल्याचे नमूद करण्यात आले आज 29 डिसेंबर चा दिवस उजाडलेला असताना या अपघात प्रकरणातील तपास अधिकारी सौंदरमल हे अपघातास कारणीभूत असलेल्या ट्रकचा शोध घेत आहेत तपास अधिकारी सौंदरमल यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली असता सदर गाडीचा नंबर आरटीओ कार्यालयाला देऊन ट्रकचा चालक ट्रकचा मालक आणि ट्रक या तिघांचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे सौंदरमल यांनी सांगितले विशेष महत्त्वाची बाब म्हणजे अपघात घडला तेव्हा अनेकांनी या अपघाताचे फोटो आणि व्हिडिओ घेतलेले आहेत त्यामुळे पोलीस घटनास्थळी आले तेव्हा ट्रक होता की नव्हता? तो गेला केव्हा? गेला कसा ? या सर्व बाबी समोर येतील असे असले तरी देखील एका मजुराचा बळी घेणाऱ्या ट्रक चा शोध पाच दिवस लागत नाही हे त्या गरीब मजुराच्या कुटुंबाचे दुर्दैवच आहे.

 

ज्यांच्याकडे फोटो किंवा व्हिडिओ असेल त्यांनी पोलीस अधीक्षक किंवा पेठ बीड पोलिसांना द्यावा

मजुरी करून पोट भरण्यासाठी उत्तराखंडातून बीडमध्ये आलेल्या एका मजुराला रस्त्यावर जीव गमवावा लागला त्या मजुराच्या गरीब कुटुंबाला न्याय मिळावा त्यांची मदत व्हावी असे वाटत असेल तर ज्यांच्याकडे अपघात स्थळावरील फोटो किंवा व्हिडिओ असेल अशांनी पोलीस अधीक्षक श्री.नंदकुमार ठाकूर यांच्याकडे वीडीयो द्यावेत कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी अशी ओळख असलेले पोलीस अधीक्षक हे नक्कीच त्या गरीब कुटुंबाला न्याय देण्यासाठी भूमिका घेतील.

Sharing

Visitor Counter