जिल्ह्यात आजपासून भव्य मराठवाडा कृषी महोत्सव

Beed

जिल्ह्यात आजपासून भव्य मराठवाडा कृषी महोत्सव

विविध कृषी तज्ञांचे लाभाणार मार्गदर्शन; वनौषधी, रानभाज्या व देशी बियाण्यांचे प्रदर्शन; मोफत आरोग्य व व्यसनमुक्ती शिबीर: शेतकरी वधू-वर परिचय मेळावा तर बेरोजगांरांना देणार रोजगार

बीड/प्रतिनिधी

श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे वतीने आयोजित भव्य मराठवाडा कृषी महोत्सवाचे आज दि.29 डिसेंबर रोजी गुरूपीठ त्र्यंबकेश्वराचे प्रशासकीय प्रमुख चंद्रकांत दादा मोरे यांच्या शुभहस्ते आणि अनेक मान्यवरांचे उपस्थित उद्घाटन सोळवा संपन्न होणार आहे. या मेळाव्यात परमपूज्य गुरूमाऊलींचा शेतकरी सत्संग मेळाव्यातून जिल्ह्यातील शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

या कृषी महोत्सवा अंतर्गत दि.29 डिसेंबर 2022 ते 01 जानेवारी 2023 दरम्यान विविध तज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे यामध्ये विषमुक्त शेती या विषयावर सेंद्रिय शेतीतज्ञ, सेंद्रिय शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त मा.श्री अण्णासाहेब जगताप, माजलगाव जिल्हा बीड यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. ते मागील 14 वर्षांपासून सेंद्रिय शेती करत असून त्यांना शासनाचे विविध पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये महाराष्ट्र शासनाचा सेंद्रिय शेती शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार 2019, सिल्वर प्ले अवॉर्ड अमेरिका युट्युब 2020, मराठवाडा कृषी भूषण युवा शेतकरी सन्मान, सेंद्रिय भूषण, ग्रोवन शेतकरी सन्मान पुरस्कार असे एकूण 15 ते 20 पुरस्काराने सन्मानित असे श्री अण्णासाहेब जगताप यांचे विषमुक्त शेतीवर व्याख्यान होईल. त्यानंतर महाराष्ट्रातील नामांकित हवामान अभ्यासक मा.श्री पंजाबराव डक, परभणी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. शुक्रवार दि. 30 डिसेंबर 2022 रोजी शेतकरी वधु वर परिचय मेळाव्यासाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून मा. सौ.शिवकन्याताई शिरसाट, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा बीड आणि माननीय डॉ.सौ.किनीकर मॅडम यांचे कुटुंब व्यवस्था आणि विवाह संस्कार याचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. शनिवार दि.31 डिसेंबर 2022 रोजी युवा महोत्सव तसेच स्वयंरोजगार महामेळावा या सत्रामध्ये मा.डॉ.आर.बी.क्षीरसागर, सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य अन्न तंत्र महाविद्यालय परभणी आणि मा.श्री.के.जी.तांदळे, उद्योग अधिकारी प्रभारी महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र बीड हे मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. 1जानेवारी 2023 या दिवशी पर्यावरण प्रकृती जनजागृती, माहिती तंत्रज्ञान जनजागृती या सत्रामध्ये माननीय श्री. सिद्धार्थ सोनवणे- निसर्ग आणि प्राणी संरक्षक यांचे पर्यावरण पूरक कृती, पर्यावरण संगोपन तसेच पर्यावरणावरील उपाय योजना या विषयांवरील व्याख्यान होईल. सरपंच ग्रामसेवक मांदियाळी परिषद या सत्रामध्ये बीड जिल्हा सरपंच संघटनेचे अध्यक्ष मा.श्री दत्ताजी काकडे यांचे मार्गदर्शन मौलिक लाभणार आहे. यामध्ये जलसंधारणाचे महत्त्व, शिक्षण कृषी आणि जलविकास, ग्रामविकास, स्मार्ट व्हिलेज या विषयावर चर्चासत्र होणार आहे. तरी मराठवाड्यातील सर्व शेतकरी विद्यार्थी तसेच सर्व सेवेकरी, ग्रामस्थ, नागरीक यांनी या सर्व सत्रांमध्ये उपस्थित राहून या तज्ञ मार्गदर्शकांचा अनुभव आणि माहिती ऐकण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

परमपूज्य गुरूमाऊलींचा शेतकरी सत्संग मेळावा

मराठवाड्यातील शेतकर्‍यांना तंत्रज्ञाची जोड देत कमी खर्चात जास्त प्रमाणात तसेच शेद्रीय पद्धतीने कसा प्रकारे शेतीत अधिक उत्पन्न मिळवीता येईल यासाठी जिल्ह्यातील शेतकर्‍यांना परमपूज्य गुरूमाऊलींचा अण्णासाहेब मोरे यांचे रविवार दि.1 जानेवारी 2023 रोजी शेतकरी सत्संग होणार असून जिल्ह्यातील जास्तीत शेतकरी बांधवानी या मेळाव्याचे लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Sharing

Visitor Counter