‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची केज तालुक्याची कार्यकारिणी जाहीर

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची केज तालुक्याची कार्यकारिणी जाहीर
- तालुकाध्यक्षपदी प्रा.हनुमंत सौदागर तर कार्याध्यक्षपदी प्रा.हनुमंत भोसले यांची नियुक्ती
केज/ प्रतिनिधी
दि.28 : हॉईस ऑफ मीडिया ही राष्ट्रीय पातळीवर काम करणारी पत्रकार संघटना असून या पत्रकार संघटनेची केज तालुक्यांची उर्वरित कार्यकारिणी राज्य उपाध्यक्ष संजय मालाणी, राज्य कार्यवाहक तथा बीड जिल्हाध्यक्ष बालाजी मारगुडे, जिल्हा कार्याध्यक्ष दिनेश लिंबेकर, संतोष कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली घोषीत करण्यात आली.
यापुर्वीच केज तालुक्यात प्रा.हनुमंत सौदागर यांची तालुकाध्यक्ष म्हणून तर प्रा. हनुमंत भोसले यांची तालुका कार्याध्यक्ष म्हणून निवड जाहीर झालेली होती. आज केज तालुक्यातील उर्वरित पदाधिकार्यांची निवड आज घोषीत करण्यात आली आहे.
देशातील 20 प्रमुख संपादकांनी एकत्रित येत या राष्ट्रीय संघटनेची स्थापना केली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष संजय आवटे, राज्याध्यक्ष राजा माने हे आहेत. पत्रकारांचे आरोग्य, पत्रकारांच्या मुलांचे शिक्षण, पत्रकारांच्या सेवानिवृत्तीचे प्रश्न, पत्रकारांचे घर, पत्रकारांना नव्या तंत्रज्ञानाला जुळवून घेण्यासाठी लागणारे प्रशिक्षण आदींवर ही संघटना प्रामुख्याने काम करणार आहे. देशातील 22 राज्यात या संघटनेचा विस्तार झालेला असून जवळपास 18 हजार पत्रकार या संघटनेशी जोडले गेले आहेत. तालुक्याच्या ग्रामीण भागांपर्यंत या संघटनेचा विस्तार करण्यात येत असून नव्या पदाधिकार्यांच्या निवडीबद्दल बीड जिल्हा शाखेचे सरचिटणीस प्रभात बुडूख, कार्यवाहक उदय नागरगोजे, केशव कदम, उपाध्यक्ष अमोल जाधव, भागवत जाधव, जालींदर धांडे, विनोद जिरे, प्रवक्ते गणेश सावंत रांजणीकर, सह सरचिटणीस सुनील यादव, कोषाध्यक्ष अनंत वैद्य, संघटक अनिल जाधव, एजाज शेख, अमोल मुळे, ज्ञानेश्वर वायबसे, प्रसिध्दी प्रमुख शुभम खाडे, सदस्य संजय तिपाले, शिरीष शिंदे, मुकेश झणझणे यांनी अभिनंदन केले आहे.
अशी आहे नविन कार्यकारिणी
1) अध्यक्ष -प्रा.डॉ.हनुमंत सौदागर 2) कार्याध्यक्ष -प्रा.हनुमंत भोसले, 3) उपाध्यक्ष -रामदास साबळे, 4) उपाध्यक्ष -मधुकर सिरसाट, 5) सरचिटणीस -दीपक नाईकवाडे, 6) सहसरचिटणीस -शेख जावेद, 7) कोषाध्यक्ष -संतोष गालफाडे, 8) कार्यवाहक -सय्यद दाऊद, 9) संघटक -मनोराम पवार, 10) प्रसिद्धी प्रमुख -दिनकर राऊत
