आर.बी.अट्टल महाविद्यालयातर्फे आंतरराष्ट्रीय वेबीनारचे आयोजन गेवराई

आर.बी.अट्टल महाविद्यालयातर्फे आंतरराष्ट्रीय वेबीनारचे आयोजन गेवराई
गेवराई/प्रतिनिधी
येथील म.शि.प्र.मंडळ संचलित र.भ.अट्टल कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय येथे दिनांक 19 जून 2020 रोजी सकाळी 11.00 वाजता इंग्रजी विभागाच्या वतीने एकदिवसीय ऑनलाईन आंतरराष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष तथा र. भ. अट्टल महाविद्यालयाचे कार्यवाह माजी आ. अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या वेबिनारमध्ये प्रा.डॉ.बजरंग कोरडे (इंग्रजी विभाग प्रमुख , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून तर डॉ.रोहिदास नितोंडे , (शिवाजी महाविद्यालय परभणी ) व डॉ.अजय देशमुख (औरंगाबाद ) हे साधनव्यक्ती म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. या वेबिनारमध्ये दिनांक 10 जून 2020 पर्यंत 1053 संशोधक प्राध्यापकांनी नाव नोंदणी केली आहे . महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.रजनी शिखरे , संयोजन सचिव डॉ.विजयकुमार बांदल व समन्वयक प्रा.अरुण जाधव यांनी संशोधक प्राध्यापकांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.








