खेळाडूंनी खेळामध्ये लक्ष केंद्रित करून आपले करियर करावे - डॉ.योगेश भैया क्षीरसागर

Beed

खेळाडूंनी खेळामध्ये लक्ष केंद्रित करून आपले करियर करावे - डॉ.योगेश भैया क्षीरसागर

डॉ.योगेश भैया क्षीरसागर यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन संपन्न

बीड/प्रतिनिधी

नगरसेवक संजय (भाऊ) उडाण यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून युवा नेते डॉ.योगेश भैया क्षीरसागर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घघाटन संपन्न झाले.

या स्पर्धेचे आयोजन बी.एन. क्रिकेट क्लब च्या वतीने करण्यात आले असून ही स्पर्धा बी.एन. क्रिकेट ग्राउंड, लॉ कॉलेज च्या पाठीमागे खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत एकूण 32 संघाचा समावेश आहे. प्रत्येक सामना आठ षटकाचा असून अंतिम सामना हा दहा षटकाचा ठेवण्यात आला आहे. डॉ.योगेश भैया क्षीरसागर यांच्या हस्ते नाणेफेक करून पाहिल्या सामन्याला सुरुवात करण्यात आली. या स्पर्धेतील विजेत्यांना डॉ.योगेश भैया क्षीरसागर यांच्या वतीने एक लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक देण्यात येणार आहे. तर अनिल दादा जगताप यांच्या वतीने ७७,७७७/- रुपयांचे द्वितीय पारितोषिक देण्यात येणार आहे.

या क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी युवा नेते डॉ. योगेश भैया क्षीरसागर यांनी बोलतांना म्हणाले की, खेळाडू वृत्तीला चालना व क्रीडा स्पर्धेला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने आपण एक लाख रुपयांचे बक्षीस आपल्याकडून देण्यात येणार आहे. युवकांनी मैदानी खेळ खेळावे, अशा या खेळामुळे युवकांना उत्साह, आनंद मिळतो.खेळामुळे चांगला व्यायाम होतो. युवकांचे आरोग्य चांगले राहते. यासाठी अशा क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करणे आवश्यक आहे. क्रिकेट खेळाडूंना योग्य मार्गदर्शन आणि सरावाची खरी गरज आहे. मेहनतीच्या जोरावर यशाचे शिखर गाठता येते. खेळाडूंनी खेळामध्ये लक्ष केंद्रित करून आपले करियर करावे, असे प्रतिपादन यावेळी डॉ.योगेश भैया क्षीरसागर यांनी केले. यावेळी त्यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंशी संवाद साधत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल बी.एन.क्रिकेट क्लब आणि सदस्यांचे अभिनंदन केले.

या उद्घाटन प्रसंगी किशोर जगताप, नगरसेवक संजय उडाण, प्राचार्य डॉ.अजित चोधरी, कल्याण ढोले, शुभम कातांगळे, गोरख काळे, राजेंद्र कुसळकर, मोहसीन खान, शहादेव वंजारे, सचिन जाधव, सचिन बोबडे, डॉ.बाळासाहेब शेंडगे, शेख सर, संतोष धोत्रे, यांच्यासह युवा खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी कानतोडे सर, बालाजी कुसळकर सचिन उरूनकर,धर्मेश पिंगळे, सागर गलधर,निशांत भांडवले, सुशील कांबळे, संतोष कुऱ्हाडे, सुशील गायकवाड,गुड्डू चाऊस यांच्यासह बी.एन.क्रिकेट क्लब चे सर्व सदस्य परिश्रम घेत आहेत.

Sharing

Visitor Counter