भारतीय स्त्रियांना समानतेचा हक्क नाकारणाऱ्या मनुस्मृतीचे दहन

भारतीय स्त्रियांना समानतेचा हक्क नाकारणाऱ्या मनुस्मृतीचे दहन
बीड/वार्ताहर
एकल महिला संघटना ही महिलांच्या हक्क अधिकारावर काम करत आहे.एकल महिला संघटना च्या वतीने मराठवाड्यात मनुस्मृती चे दहन 11 तालुक्यात आज घोसापुरी येथे 25 डिसेंबर स्त्री मुक्ती दिन साजरा करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुलोचना शिंदे तर प्रमुख मार्गदर्शन रुक्मिणी नागापुरे यांनी केले. तसेच पुस्तकावर प्रेम करणारे तसेच पुस्तकासाठी घर बांधणारे अहोरात्र वाचनात रममाण राहणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे विषमतेचे समर्थन करणारा मनुस्मृती हा ग्रंथ जाळून आजच्या दिवशी महिलांना मुक्त केले तसेच तिथे जमलेल्या लाखो महिलांना रूढी आणि परंपरांनी लादलेली हजारो वर्षापासूनची गुलामी झुगारून देण्याचा उपदेश दिला. या व्यवस्थेत
महिलांना समाजात वावरताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते त्यात आपला समाजात पुरुषप्रधान व्यवस्था असून त्यात ही महिलांना कुठेही समानतेची वागणूक मिळत नाही.
या मनुस्मृतीने महिलांना शिक्षणाचा अधिकार, आर्थिकआर्थिक अधिकार, पुनर्विवाह, आंतरजातीय विवाह, आपत्य नसलेल्या महिला, तसेच संपत्ती अधिकार नाकारलेले आहेत. त्यात महिलांना आणखी हीन दर्जाची वागणूक मिळत आहे.
एकल महिला संघटना च्या माध्यमातून महिलांना या ठिकाणी मनुस्मृती मधील महिलांना नाकारलेल्या गोष्टीवर सविस्तर चर्चा करून आंतरजातीय विवाह केलेल्या व आपत्य नसलेल्या जोडप्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच घोसापुरी ग्रामपंचायत चे बिनविरोध निवड झालेल्या सरपंच यांचा एकल महिला संघटना महिला मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी संविधान मुळे महिलांना दिलेल्या हक्क व अधिकार, आरोग्य,शिक्षण यावर सखोल चर्चा झाली तर शेवटी संविधान प्रस्ताविक वाचन करून कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी घोसापुरी, नामलगाव फाटा येथील प्रेरणा, अहिल्या, व शबरी महिला मंडळाच्या गावशाखा चे अध्यक्ष, सचिव व खजिनदार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली
असून सुलोचना शिंदे, याची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आले तसेच लक्ष्मी पखाले, सीमा क्षीरसागर, प्रतिभा, उर्मिला गोळेकर, सुलोचना शिंदे, संजीवनी लोंढे, लता शिंदे, नंदा वैद्य, रुक्मिणी मनीषा पखाले, सोमित्रा काटूळे, अर्चना बनसोडे, मीरा नवले, शोभा काळे, रंजना भोसले, रेणूका गोरे आदी महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.








