राज्यस्तरीय लोकरत्न पुरस्कार 2023 चे सौ. शिवलता बांगर, डॉ.अशोक कोकणे,दिनेश पवार, डॉ.प्रवीण देशमुख,राहुल गिरी यांना जाहीर

राज्यस्तरीय लोकरत्न पुरस्कार 2023 चे सौ. शिवलता बांगर, डॉ.अशोक कोकणे,दिनेश पवार, डॉ.प्रवीण देशमुख,राहुल गिरी यांना जाहीर
बीड/प्रतिनिधी
पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने दिला जाणारा 2023 सालचा लोकरत्न पुरस्कार त्यांच्या आदर्श सेवा या करायला पाहून देण्यात आला आहे. सौ. शिवलता बांगर, डॉ.अशोक कोकणे,दिनेश पवार, डॉ.प्रवीण देशमुख,राहुल गिरी यांना जाहीर झाला असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
3 जानेवारी 2023 मंगळवार रोजी दुपारी 12 : 30 वाजता बीड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृहात आयोजित लोकरत्न पुरस्कार कार्यक्रम होणार भगवत वैद्य प्रदेश संघटक पुरोगामी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजन केले आहे.
सौ. शिवलता बांगर यांनी काहीं वर्ष पूर्वी बीड येथे द वूमनस ब्युटी पार्लर कॉलेज भव्य दिव्य असे चालु केले आहे. ऊसतोड मजुरांच्या मुलींना सवलती मध्ये प्रशिक्षण देत आहेत. एक महिला उद्योग व्यवसाय मधे एक पाऊल पुढे टाकत समाज सेवा करत आहे. अणि आता अजुन एक हॉस्पिटल सुरू करत आहेत. फक्त 10 रुपये ओ. पी. डी.असेल खुप छान कामाला सुरुवात केली आहे. डॉ. अशोक कोकणे हे मूळ रहिवासी बीड चे आहेत.त्यांनी बीड येथील सरकारी दवाखान्यात आर. एम. ओ. पदी काही वर्ष काम केले आहे. त्या नंतर त्यांची नांदूर बार जिल्हा शल्चिकित्सक पदी काम केले आहे. काम करत असताना त्यांनी कुणाला ही दुजा भाव दिला नाही. एक समान पध्दतीने चांगले काम केले आहे. आज ही त्यांचे नाव एक आदर्श डॉक्टर म्हणून त्यांची ओळख आहे.डॉ.प्रवीण देशमुख यांनी खुप छान हॉस्पिटल सुरू केले आहे.त्यामध्ये गोरगरिबांना चांगली सेवा देण्याचे त्यांचे प्रयत्न नेहमी असते.ते एक हाडाचे डॉक्टर आहेत. सर्व सोई सुविधा उपलब्ध आहेत.तसेच दिनेश लाला पवार हे एक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अपली शेती करतात.त्यांनी अनेकांना रोजगार दिला आहे. त्याच बरोबर ते एक गोर गरीब अनाथ मुलांचे निवासी वसतिगृह चालवतात. शेती सोबतच शेती पूरक जोड धंदा देखील करतात.एक प्रगत शेतकरी म्हणून त्यांची चांगली ओळख निर्माण केलेली आहे.
राहुल गिरी यांनी राज्य व राष्ट्रीय भाषण स्पर्धांचे विजेते पदे भूषविली आहेत.तसेच ते नामांकित वक्ते व युवा अभ्यासक राहुल गिरी यांना प्रदान केला जात आहे. अतिशय कमी वयात देशाच्या संसदेपर्यंत मजल मारुन राज्याचे नेतृत्व दिल्लीत करण्याची किमया साधणारे राहुल गिरी हे बीडवासियांचा अभिमान आहेत. नवतरूणांसाठी ते प्रेरक आहेत. या पुरस्काराच्या घोषणेनंतर त्यांचे सर्व स्तरांतून कौतूक होत आहे.विविध पद्धतीने केलेल्या त्यांच्या समाज कार्याची दखल घेऊन पुरोगामी पत्रकार संघाचे प्रदेश संघटक भगवत वैद्य यांनी लोकरत्न पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास जिल्हा पोलिस अधीक्षक ठाकूर साहेब, अजित पवार बीड जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी,. माजी मंत्री सुरेश नवले साहेब ,बीड जिल्हा अप्पर जिल्हाधिकारी उत्तमराव पाटील , संजय मस्के जिल्हा ग्रंथालय अधिकारी साहेब, देशमुख बीड. जिल्हा पुरवठा अधिकारी साहेब,कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग क्र.1 तोंडे साहेब, मार्कंडेय साहेब सां.बा. विभाग क्र.2 बीड,
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुरेश साबळे साहेब, बीड जिल्हा पोलिस अप्पर अधीक्षक सचिन पांडकर साहेब,विलास भोईटे अधीक्षक बीड जिल्हा कारागृह , इम्रान हाश्मी सा.आयुक्त अन्न व औषध प्रशासन बीड,बीड जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ गित्ते, जिल्हा जल संधरान अधिकारी परांडकर साहेब जायकवाडी,देशमुख साहेब प्रभारी राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक साहेब, माजी मंत्री बदामराव पंडित, ,रणजित शिरसगर कॉन्ट्रॅक्टर, निकम कार्यकारी अभियंता विद्युत महावितरण कंपनी, शिंदे सा. आयुक्त समाज कल्याण , बिजेंद्र झा. एल. डी. एम. ,बीड जिल्हा अध्यक्ष बिजेपी राजेंद्र मस्के साहेब,अमर नाईकनवडे शिव सेना सभापती न. पा.बीड, नगरसेवक शुभम धुत,वसंत मुंडे प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,सुभाष चौरे बीड जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र पत्रकार परिषद, अँड.प्रकाश कवठेकर जिल्हा परिषद सदस्य,मराठवाडा अध्यक्ष वैभव स्वामी,महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्यार्थ्यां वस्तीगृह प्रदेश अध्यक्ष दिनेश लाला पवार, बीड तहसीलदार सुहास हजारे,
आर. एफ. ओ. अशोक काकडे ,सुहासिनी देशमुख जिल्हा क्रीडा अधिकारी ,खरात जिल्हा ग्रामोद्योग केंद्र बीड,राजूशेठ
बंब माजी अध्यक्ष रोटरी क्लब बीड,विजयकुमार वाव्हळ प्रदेश अध्यक्ष पुरोगामी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य., प्रदेश उपाध्यक्ष प्रा. दशरथ रोडे पुरोगामी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य, भगवत वैद्य (प्रदेश संघटक पुरोगामी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य),विजय दादा पोकळे सी. एम. डी. महीला विकास संघ महाराष्ट्र राज्य, शिवराज बांगर सामाजिक कार्यकर्ते ,अलीम पटेल आर.सी.सी.बांधकाम कामगार नेते, मोमिंद्दिन शेख बांधकाम कामगार नेते, चंद्रकांत कांबळे राशन हक्क विकास समिती अध्यक्ष मराठवाडा विभाग पुरोगामी पत्रकार संघ, उत्तम ओव्हाळ बीड जिल्हा अध्यक्ष पुरोगामी पत्रकार संघ, बीड जिल्हा कार्यकारणी तील पदाधिकारी यांच्या हस्ते राज्यस्तरीय लोकरत्न पुरस्कार देणार आहेत.








