राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंतराव पाटील यांच्या निलंबनाच्या निषेधार्थ आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकार विरोधात तीव्र निदर्शने

Beed

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंतराव पाटील यांच्या निलंबनाच्या निषेधार्थ आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकार विरोधात तीव्र निदर्शने

शिवद्रोही राज्य सरकार विरोधात आमचा लढा सुरू राहणार-आ.संदीप क्षीरसागर

बीड/प्रतिनिधी

नागपूर येथे सुरू असलेल्या अधिवेशनात विरोधी पक्षाच्या प्रश्नांना उत्तर देताना सत्ताधारी पक्ष असमर्थ ठरला असून राज्य सरकारच्या पायाखालची वाळू सरकली आहे. लोकप्रतिनिधीचा आवाज दाबण्याचे काम या अधिवेशनात राज्य सरकारकडून होत असून या पार्श्वभूमीवर आज सरकारने लोकप्रतिनिधीच्या रास्ता प्रश्नाला उत्तर न देता लोकशाहीचा आणि लोकप्रतिनिधीचा गळा दाबण्याचे काम केले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंतराव पाटील यांच्यावर सूडबुद्धीने निलंबनाची कारवाई केली याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांनी विरोधीपक्ष नेते आ अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली सभागृहाच्या पायरीवर बसून सरकार विरोधात निलंबन मागे घेण्याकरता निदर्शने केले असुन 

उद्या बीड तालुक्यात शिवद्रोही सरकारच्या विरोधात आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निलंबनाच्या निषेधार्थ बीड जिल्हाधिकारी कार्यालय समोर लोकशाही मार्गाने तीव्र निदर्शने करण्यात येणार असून या निदर्शनास बीड तालुक्यातील आणि मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, विविध आघाडीचे प्रमुख, महिला आघाडी राष्ट्रवादी युवक पदाधिकारी, आणि सर्व कार्यकर्त्यांनी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय समोर हजर रहावे असे आवाहन बीड मतदार संघाचे आ.संदीप क्षीरसागर यांनी केले आहे.

 

Sharing

Visitor Counter