जिल्हास्तरीय युवा मंडळ पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

जिल्हास्तरीय युवा मंडळ पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन
बीड/वार्ताहर
केंद्र शासनाच्या युवा कार्य व क्रिडा मंत्रालयांतर्गत कार्य करणा-या नेहरु युवा केंद्र बीड व्दारा जिल्ह्यातील नेहरु युवा केंद्राशी संलग्न नोंदणीकृत युवक, युवती मंडळाकडून विशेष युवा मंडळ पुरस्कार 2022-23 जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 या कालावधीत बीड जिल्ह्यातील युवक, युवतींच्या सर्वांगिन विकासासाठी आरोग्य, शिक्षण, पर्यावरण संवर्धन, क्रिडा संस्कृती, स्वंयरोजगार, महिला सशक्तीकरण, अंधश्रध्दा व कुप्रथा निर्मुलन इत्यादी युवा विकास क्षेत्रात उल्लेखनिय सामाजिक कार्य करणा-या एका युवा मंडल पुरस्कारासाठी गुणानुक्रमाने निवड करण्यात येणार असून इच्छुकांनी 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 या कालावधीत केलेल्या सामाजिक कार्याचे पुरावे, पेपरकात्रण, फोटो, घटना नोंदणी प्रमाणपत्रे, (1860 व 1950) संलग्नता प्रमाणपत्र अंकेक्षण अहवाल, वार्षिक अहवाल इत्यादी नमून्यातील अर्ज नेहरू युवा केंद्र, दिप एजन्सी, नगररोड बीड येथे 31 डिसेंबर 2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी, नेहरु युवा केंद्र बीड यांनी केले आहे.
पुरस्काराचे स्वरुप 25 हजार रुपये, प्रमाणपत्र असे आहे. अर्ज सादर करणारे युवा मंडल 18 ते 25 वयोगटाचे असावेत, अर्जासोबत युवा मण्डलाचे घटना, नोंदणी प्रमाणपत्र, (1860 व 1950) संलग्नता प्रमाणपत्र अंकेक्षण अहवाल, वार्षिक अहवाल इत्यादी सादर करावेत. मागील दोन वर्षात हा पुरस्कार मिळालेल्या संस्थेने अर्ज करु नयेत. अर्जाचा नमूना तथा अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या वरील पत्यावर संपर्क साधावा.








