विषमतावादाला झोडपत समतेचा विचार मांडला

Beed

विषमतावादाला झोडपत समतेचा विचार मांडला अभिवादन बार्टी केंद्रात राहुल वाघमारे यांचे प्रतिपादन

बीड /  प्रतिनिधी

संत गाडगेबाबा महाराज यांनी विषमतावादाला झोडपत समतेचा विचार मांडला. एवढेच नव्हे तर लोकजीवन तेजाने उजळण्यासाठी त्यांनी हातातील खराट्याने गावाचे रस्ते झाडीत ते महाराष्ट्रात सर्वत्र फिरले. खरं तर गाडगे महाराज चालते फिरते सामाजिक शिक्षक होते. असं प्रतिपादन सम्राट प्रतिष्ठान संचलित छत्रपती राजर्षी शाहू स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे संचालक राहुल वाघमारे यांनी व्यक्त केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अनिल डोळस यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
 बीड शहरातील शहरात सावंत प्लाझा, मित्र नगर चौकाजवळ शिवाजी नगर येथे  बार्टी मार्फत सुरु असलेल्या सम्राट प्रतिष्ठान संचलित छत्रपती राजर्षी शाहू स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र येथे आयोजित संत गाडगेबाबा महाराज स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या अभिवादन कार्यक्रमांत राहुल वाघमारे बोलत होते.
उपस्थितांना  मार्गदर्शन करतांना राहुल वाघमारे  म्हणाले की, विवेकाच्या खराट्याने गावोगावी फिरून त्यांनी लोकांची मने स्वच्छ केली. खेडोपाडी, शहरोशहरी जाऊन कीर्तने केली. शिक्षणाचे महत्व लोकांना पटवून दिले. साक्षरतेचा प्रचार, प्रसार केला. गाडगे महाराज हे गोरगरीब, दीनदलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे समाजसुधारक होते. असे मनोगत राहुल वाघमारे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सम्राट प्रतिष्ठान संचलित राजर्षी शाहू स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्राचे केंद्र प्रमुख  प्रा. अविनाश वडमारे, ग्रंथापाल सचिन काकडे, प्रा. अमोल क्षीरसागर, प्रा. भरत खेत्रे, प्रा. प्रतिक्षा हिवरकर, दिलीप गायकवाड, सहाय्यक प्रा. अर्चना आठवले, फोटोग्राफर राहुल शिंदे, सहाय्यक  गजानन खेत्रे यांनी मोलाचे परिश्रम घेतले 

Sharing

Visitor Counter