शहापूर मजरा ग्रामपंचायतची धुरा सौ.उज्वला नवनाथ आळणेंच्या खांद्यावर

Beed

शहापूर मजरा ग्रामपंचायतची धुरा सौ.उज्वला नवनाथ आळणेंच्या खांद्यावर

सरपंचपदी दुसर्‍यांदा निवडून देत पुन्हा एकदा जनसेवेची दिली संधी

बीड/प्रतिनिधी

अटी-तटीच्या लढत असलेल्या शहापूर मजरा ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये गावातील सुजान मतदारांनी सुशिक्षीत व विद्याविभूषीत गावची लेक सौ.उज्वला नवनाथ आळणे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत बहुमताने निवडून देत संरपच पदाची धुरा सांभाळण्यासाठी तसेच पुढील पाच वर्षे पुन्हा एकादा गावच्या सेवेची संधी दिली आहे.

माजी सरपंच प्रकाश आळणे यांनी केलेल्या मागील पाच वर्षामधील गावातील विकास कामाचा आराखडा तसेच पुढील पाच वर्षात केल्या जाणार्‍या जाहीरनाम्यातून जनसेवा हिच ईश्‍वर सेवा म्हणून जनसेवेत कायम राहत असलेल्या नवनाथ आळणे यांच्या पत्नी सौ.उज्वला नवनाथ आळणे यांच्या पाठीशी गावातील नागरिकांनी एकी दाखवत खंबीरपणे मतदानरूपी आशिर्वाद दिल्याने पुन्हा एकदा गावाची सेवा तसेच गावाचा विकास करण्यासाठी गावकर्‍यांनी गावकारभारी म्हणून निवडून दिले आहे. गावकर्‍यांचा विश्वास तसेच गावातील तरूण, जेष्ठ, महिला व सर्व मित्र परिवारांनी केलेल्या सहकार्यामुळेच पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. तरी येणार्‍या पुढील पाच वर्षामध्ये गावच्या सर्वांगिण विकासाठी कायम कटीबद्ध राहत सेवा देणार असल्याचे नवनाथ आळणे व प्रकाश आळणे यांनी सांगितले आहे. तसेच त्यांच्या संत लिंबाजी बाबा ग्रामविकास पॅनलच्या वार्ड क्रमांक दोन मधील ज्ञानेश्वर सुंदरराव आवचार, सुर्यभान सटवाजी फरताडे, कालिंदा राहुल गाडवे या तिन्हीही उमेदवारांचा दणदणीत विजय झाला.

गोवर्धन नगरच्या ग्रामस्थांचा मिळाली खंबीर साथ

प्रतिष्ठेच्या लागलेल्या शहापूर मजरा ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये गोवर्धन नगर तांड्यातील जेष्ठ नागरिक, महिला भगिणी यांच्यासह तरूणांनी रात्रदिवस परिश्रम घेत मतदारांच्या गाठीभेटी घेवून सौ.उज्वला नवनाथ आळणेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन करत मतदानरूपी आशिर्वाद मिळवून देण्यासाठी खंबीर साथ दिली असल्याचे नवनिर्वाचित सरपंच सौ.उज्वला नवनाथ आळणे यांनी सांगितले आहे.

Sharing

Visitor Counter