तेलघणा ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदी महेश सिरसाट यांचा विजय

Beed

तेलघणा ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदी महेश सिरसाट यांचा विजय

अंबाजोगाई/प्रतिनिधी

परळी विधानसभा मतदार संघातील अंबाजोगाई तालुक्यातील तेलघणा ग्रामपंचायत निवडणुकीत माजी मंत्री आ.धनंजय मुंडे, बन्सीअण्णा सिरसाट, शिवाजी सिरसाट यांच्या नेतृत्वाखालील संत माधवबाबा ग्रामविकास पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार महेश सिरसाट यांच्यासह सर्वच्या सर्व सात उमेदवार बहुमताने विजयी झाले आहेत.

        मंगळवार दि.20 रोजी जाहिर झालेल्या निकालात सरपंच महेश सिरसाट यांच्यासह सदस्य म्हणुन गोविंद केंद्रे, योगिता सिरसाट,मुद्रीका केंद्रे,लक्ष्मीबाई सिरसाट,दैवशाला दराडे,बालासाहेब सिरसाट हे सातही उमेदवार बहुमताने विजयी झाले. निकालानंतर विजयी उमेदवार व गावकर्यांनी परळी व तेलघणा येथे विजयोत्सव साजरा केला.

              माजी मंत्री तथा आ. धनंजय मुंडे यांनी या सर्व नवनिर्वाचित सदस्य व सरपंच यांचे अभिनंदन केले असून, या विजयाचे शिल्पकार शिवाजी सिरसाट यांचेही विशेष कौतुक केले आहे, तसेच आगामी काळात गावच्या सर्वांगीण व सर्वंकष विजयासाठी उत्तम कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच सर्व नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा आ. धनंजय मुंडे व ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या हस्ते जगमित्र कार्यालयात जंगी सत्कारही करण्यात आला.

 

Sharing

Visitor Counter