ग्रामपंचायत निवडणूकींचा निकाल मंगळवारी जाहिर

ग्रामपंचायत निवडणूकींचा निकाल मंगळवारी जाहिर
बीड/प्रतिनिधी
ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून या निकालात मोठे बदल पाहण्यास मिळाले आहे. राष्ट्रवादीचा मोठा आकडा या ठिकाणी पाहण्यास मिळाला तर भाजप प दुसऱ्या क्रमांकावर तीन वाजेपर्यंत आकडेवारीवर पाहण्यास मिळाले आहे.
स्थानिक पातळीवरील ग्रामविकासाची सर्वात मोठी संस्था असलेल्या ग्रामपंचायत निवडणूकींचा निकाल मंगळवारी जाहिर झाला. गावगाडा चालवण्यासाठी ग्रामस्थांनी मोठ मोठ्या नेत्यांना हादरा दिल्याचे चित्र जिल्ह्यासह राज्यात दिसून आले. शिंदे गटाने ही स्थानिक पातळीवर आपला झेंडा गाडला आहे. तर बीड जिल्ह्यात केज मध्ये भाजपा नेते रमेश आडसकर यांनी आपला दबदबा कायम ठेवला आहे. बीडचे आ. संदिप क्षीरसागर यांनी त्यांचे काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांना राजूरीच्या भूमीवर धोबीपछाड दिली. परळी तालूक्यात माजी मंत्री आ. धनंजय मुंडेंनी माजी मंत्री पंकजाताईंच्या वर्चस्वाला धक्का लावत अनेक ग्राम पंचायती ताब्यात घेतल्या. माजलगाव तालूक्यात मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष अशोक डक यांना गावकर्यांनी मुंबईला पाठवले. तर बीड तालूक्यात भाजपने इन्ट्री करत ७ ग्रा.पं.वर भाजपाचे झेंडा फडकावला.
सरपंच पदाचे विजयी उमेदवार
मांजरसुंबा - मनिषा अरूण रसाळ, अंधापुरी - मनिषा पप्पु जगताप, वांगी - अशोक वाघारे, बाभळखुंटा - संजय आसाराम सोळंकर, शिवणी- अजय मोहन सुपेकर, चाकरवाडी - विनोद शंकर कवडे, नायगाव - मंजुषा संदीप कवठेकर, अंबिलवडगाव- विलास किलमिसे, सफेपुर-महादेव आहेर, कुंभारी- उमेश भालेराव, सावरगाव - विजयाबाई शिवाजी वाघमारे, तांदळवाडी घाट - बळीराम अर्जुन सिरसाट, सिरसाळा - सय्यद अन्वर पट्टेदार, मंझेरी हवेली - रेश्मा अंबादास गुजर, धनगरवाडी - केशरबाई धोंडीराम लकडे, पाली - मंजुषा नवले, अंबेसावळी-धनंजय गुंदेकर, पिंपळनेर-सतिष पाटील, हिवरा पहाडी- अशोक शिंदे, वलीपुर - रामेश्वर घुमरे, जरूड - श्रीराम काकडे, नाळवंडी - डॉ. इकबाल पठाण, शहाजानपुर - धुताडमल अनिता, सांडरवण - मनिषा लांडे, पिंपळादेवी- दत्ता किवणे, बोरदेवी - सुशिला आडसळ








