डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण, विस्तारीकरणासाठी सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांचे मुख्याधिकारीस निवेदन
बीड/प्रतिनिधी
दि. 19 डिसेंबर, बीड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांचे सुशोभीकरण व तांत्रिकदृष्ट्या विस्तार करण्यात यावा या मागणीचे निवेदन बीड नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री उमेश ढाकणे यांना सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यात आले. सदरचा पुतळा सुमारे 50 ते 60 वर्षांपूर्वीचा असून प्रतिवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी हजारोंच्या संख्येने आंबेडकरी समूह एकत्र जमतो आहे.
परंतु सदरच्या जनसमुदायास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी अत्यंत गैरसोयीचे होते आहे.ही बाब लक्षात घेऊन आज रोजी सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने सदरचे निवेदन देण्यात आले.
सदरच्या शिस्तमंडळामध्ये अनंत सरवदे, सेवानिवृत्त तहसीलदार, दापोली कृषी विद्यापीठाचे निवृत्त रजिस्ट्रार व निमंत्रक महादेव डोळस साहेब, प्राचार्य गुलाबराव जगताप, एस ए सोनवणे, वैजनाथ ससाने, चंद्रकांत सोनवणे, सोनाजी साळवे कोर्ट, सेवानिवृत्त ए.एस.आय प्रकाश वक्ते, जी,के जाधव आदींचा समावेश होता.याप्रसंगी नगरपालिकेचे मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांनी असे अभिवचन दिले की, " यापूर्वी टेंडरिंग प्रोसेस सुरू केलेली होती. पण अद्याप कोणी टेंडर भरलेले नाही.आता नव्याने शुद्धिपत्रक काढून टेंडरिंग प्रोसेस नव्याने सुरु करून, संबंधित अभियंत्याला प्लॅन आणि इस्टिमेट तयार करण्याचे आदेश देऊन सदरची टेंडरिंग प्रोसेस फक्त चार दिवसात परिपूर्ण केली जाईल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा विस्तारीकरण व सुशोभीकरणाच्या संदर्भाने विहित प्रस्ताव नगर विकास खाते व आर्थिक तरतुदीसाठी संबंधित खात्याकडे पाठवण्याचा पाठपुरावा मी व्यक्तिशः करणार आहे. पाठपुरावा करण्यासाठी मी कुठेही कमी पडणार नाही असे अभिवचन मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांनी शिष्टमंडळास दिले.








