शेख मुबीन मोईन यांची भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या

Beed

शेख मुबीन मोईन यांची भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या शहराध्यक्षपदी निवड

बीड/प्रतिनिधी

शहरातील आसेफनगर भागातील रहिवाशी धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते शेख मुबीन मोईन यांची भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या बीड शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. शासकीय विश्रामगृहात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे आणि शेख युनूस चऱ्हाटकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

            सामाजिक कार्यात डॉ. गणेश ढवळे यांच्यासोबत खंदे समर्थक म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून शेख मुबीन मोईन कार्यरत आहेत. डॉ. ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक आंदोलनात ते धडाडीने सहभागी असतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष डॉ. गणेश ढवळे यांच्या सूचनेवरून जिल्हाध्यक्ष शेख युनूस चऱ्हाटकर यांनी शेख मुबीन यांना डॉ. ढवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्तीपत्र देऊन त्यांची बीड शहराध्यक्षपदी निवड केली. त्यांच्या या निवडीचे समस्त आसेफनगरवासीयांनी अभिनंदन केले असून यापुढेही मुबीन हे सामाजिक कार्य आपल्या कर्तृत्वाने अजून जोमाने सुरू ठेवतील अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.

Sharing

Visitor Counter