मुतवल्लींची प्रकरणे मार्गी लावल्याबद्दल हाजी जाकेर यांच्या वतीने समीर काझी यांचा सत्कार

Beed

मुतवल्लींची प्रकरणे मार्गी लावल्याबद्दल हाजी जाकेर यांच्या वतीने समीर काझी यांचा सत्कार

बीड/प्रतिनिधी 

वक्फ बोर्डाचे सदस्य समीर काझी यांनी प्रलंबीत असलेल्या मुतवल्लींच्या 65 प्रकरणावर निर्णय घेत हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल ऑल इंडिया ओबीसी ऑर्गनायझेशनचे बीड जिल्हा सहसचिव तथा मुस्लिम शहा छप्परबंद सामाजिक विकास मंडळाचे जिल्हाध्यक्ष हाजी जाकेर यांनी समीर काझी यांचा सत्कार करून आभार मानले. यावेळी पत्रकार सय्यद फेरोज अली यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

नागपूर येथे वक्फ बोर्डाचे अध्यक्ष डॉ.वजाहत मिर्झा यांच्या अध्यक्षतेखाली व सदस्य बीड येथील समीर काझी यांच्या उपस्थितीत झालेल्या महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. नागपुर येथे वक्फ बोर्डाची बैठक घेण्यात आली या बैठकीला बोर्डाचे बीड येथील सदस्य समीर काझी यांचीही उपस्थिती होती. यावेळी बोर्डाचे कामकाज गतीमान व पारदर्शी होण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. बोर्डाकडे प्रलंबीत असलेल्या मुतवल्लींचे 65 प्रकरणे मार्गी लावण्यात समीर काझी यांना यश आले. यासंदर्भात त्यांनी सुरुवातीपासून पाठपुरावा केला होता. त्याबद्दल हाजी जाकेर, शेख मोसीन, रहीम भाई, जुनेद भाई यांनी त्यांचा सत्कार करून आभार व्यक्त केले.

 

Sharing

Visitor Counter