वन्यजीव संरक्षण प्रेमी अरुण शेवाणे यांनी विहिरीत पडलेल्या हरिणाला प्राथमिक उपचार करून दिले जीवदान

Beed

वन्यजीव संरक्षण प्रेमी अरुण शेवाणे यांनी विहिरीत पडलेल्या हरिणाला प्राथमिक उपचार करून दिले जीवदान
     
बीड/वार्ताहर 

शेतातील विहिरी जवळून जातांना विहिरीतून हरिणचा ओरडण्याचा आवाज विहिरी जवळून जाणारा मजूर हरिदास लोंढे यांना आला. त्यानी शेतकरी नागेश मळसणे यांना सांगितले. नागेश ने लगेच वन्यजीव सुरक्षक  अरुण शेवाणे यांना सदर घटनेची माहिती दिली. वन्य पशुप्रेमीनी हरिण विहिरीतून बाहेर काढून जीवदान दिले. प्राप्त माहितीनुसार अंजनगाव तालुक्यातील कापूसतळणी परिसरातील बोरगाव अंबाडा शेत सर्वे नंबर ६० शेत शिवारातील नागेश मळसणे यांच्या शेतातील ८० फूड खोल असलेल्या ओसाड विहिरीत पाच महिने वयाचे हरिण विहिरीत पडले. जीवाच्या आकांताने ओरडत होते. ही बाब परिसरातील पक्षी प्रेमींच्या निदर्शनात येतात त्यांनी जीवाची बाजी लावून हरिण ला विहिरीतून बाहेर काढत जीवदान दिले. ही घटना दि.१६ डिसेंबर २०२२ ला सकाळी घडली.
     नागेश मळसणे यांच्या शेतात तुरीवर फवारणी करते वेळेस विहिरीजवळून जाताना हरिण चा जोरजुराने ओरडण्याचा आवाज येत होता. लगेच शेतकरी नागेश मळसणे यांनी वन्यजीव सुरक्षक तथा कृषीमित्र अरुण शेवाणे  यांना सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास फोनवरून घटनेची माहिती दिली. लगेच अरुण शेवाणे यांनी आपले सवंगडी प्रदीप सातवटे यांच्यासह दोर व पाणी घेऊन घटनास्थळी पोहचले. दरम्यान हरिणाला तहान लागल्याचे ओळखून त्याच्यासाठी पाणी सोडले व लगेच हरिणाला विहिरीतून वर काढले. या कार्यासाठी गणेश पाठक ,निलेश पटवी ,हरिदास लोंढे, ओंकार मळसणे ,प्रदीप सातवटे मुकेश शिरसाट यांचे सहकार्य लाभले. हरिणाचा समोरचा पाय जखमी व तुटून मासावर लटकलेल्या अवस्थेत असल्यामुळे हरिण वर औषध उपचार होऊन जीवदान मिळावे यासाठी अरुण शेवाणे यांनी आपल्या स्वतःच्या दुचाकीवर प्रदीप सातवटे  व  त्या जखमी हरिण ला सोबत घेऊन अंजनगाव येथील पशुवैद्यकीय गाठून प्राथमिक उपचार केला, परंतु हरिणाच्या पायावर येथे उपचार होत नसल्यामुळे वनसंरक्षक जेआर पालीयाड यांना पुढील उपचाराकरिता ताब्यात दिले. अरुण शेवाणे व मित्रपरिवार  मुक्या प्राण्यांना अभय देण्याचे काम सतत करत असल्यामुळे त्यांची चर्चा परिसरात होत आहे . वनसंरक्षक जे आर पालीयाड यांनी पशु प्रेमींचे अभिनंदन व्यक्त केले.

Sharing

Visitor Counter