तीस वर्षांची प्रतीक्षा नऊ वर्षांचा संघर्ष फळाला येतोय !

तीस वर्षांची प्रतीक्षा नऊ वर्षांचा संघर्ष फळाला येतोय !
प्रसिद्धी माध्यमांचे आभार मानावे तेवढे थोडेच - एस.एम.युसूफ़
बीड/प्रतिनिधी
गेल्या ३० वर्षांपासून आसेफ़नगरचा मुख्य रस्ता व नाला व्हावा याकरिता असलेली प्रदीर्घ प्रतीक्षा एकदाची संपली असून गेल्या नऊ वर्षांचा संघर्ष फळाला येत आहे. यासाठी सदैव साथ दिलेल्या प्रसिद्धी माध्यमांसह आंदोलनकर्त्यांचे आभार मानावे तेवढे कमीच असल्याचे मत मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून व्यक्त केले आहे.
याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, आसेफ़नगर चा मुख्य रस्ता आणि मोठा अगडबंब नाला विकासापासून गेल्या ३० वर्षांपासून कोसोदूर होता. हा रस्ता व नाला व्हावा याकरिता सन २०१४ सालापासून शासन-प्रशासन दरबारी वेळोवेळी निवेदने दिली. दोन वेळा पान-फुल वहा आंदोलन तर एकदा निषेध आंदोलन केले. या सर्व कार्याची स्थानिक व विभागीय वृत्तपत्रे, वेब पोर्टल्स, युट्यूब चॅनल्स् , सोशल मिडिया या सर्व प्रसिद्धी माध्यमांनी वेळोवेळी नोंद घेऊन ठळक प्रसिद्धी दिली. याचाच परिपाक म्हणून दीड महिन्यापूर्वी एकदाचा येथील कामास मुहूर्त मिळाला व प्रत्यक्ष कामास सुरूवात झाली. गेल्या दीड महिन्याच्या कालावधीमध्ये रस्त्याच्या एका बाजूची नाली बांधून पूर्ण तयार झाली असून शहिंशाह नगर मुख्य रस्त्याच्या क्रॉसिंगसह ५ गल्ल्यांच्या क्रॉसिंग ची कामेही पूर्ण झाली आहेत. अटल अमृत योजनेच्या उर्वरित पाईपलाईनचे कामही करण्यात आले असून आता फक्त मोठ्या अगडबंब नाल्याचे बांधकाम आणि रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम करायचे बाकी आहे. आता लोकप्रतिनिधी म्हणून आमदार, मुख्याधिकारी, अभियंता आणि गुत्तेदार यांनी मनावर घेतले तर गुणवत्तापुर्णरित्या तेही लवकरच पार पडेल. यात दुमत नाही. मात्र तूर्तास तरी हळूहळू का होईना काम मार्गी लागल्याने ३० वर्षांची प्रतीक्षा व नऊ वर्षांचा संघर्ष फळाला येत असल्याने याबाबत साथ दिलेल्या सर्व स्थानिक व विभागीय वृत्तपत्रे, वेब पोर्टल्स, युट्यूब चॅनल्स् , सोशल मिडिया या सर्व प्रसिद्धी माध्यमांसह ज्येष्ठ नागरिक नजीर भाई तांबोळी, शेख अब्दुल हमीद, शेख मुबीन, मुहम्मद मोईजोद्दीन (जुनैद), शेख खालेद, अकबर खान सह अन्य आंदोलनकर्त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच असल्याचे मत मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून व्यक्त केले आह.








